Latest

IPL 2021 : मुंबईच्या फॅनसाठी महत्वाची बातमी; वेळापत्रकात पुन्हा बदल

backup backup

आयपीएल २०२१ (IPL 2021) चा उर्वरित हंगाम सध्या युएईमध्ये खेळला जात आहे. हा आयपीएलचा १४ वा हंगाम गेल्या मे महिन्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुढे ढकलावा लागला होता. आता हा उर्वरित हंगाम भारताऐवजी युएईमध्ये खेळवण्यात येत आहे. सुरुवातीपासूनच हंगामावर कोरोनाचे सावट राहिल्यामुळे आयपीएलचा (IPL 2021) १४ वा हंगाम साशंकतेच्या गर्तेत राहिला आहे. आता बीसीसीआयने पुन्हा एकदा आयपीएलच्या वेळापत्रकात बदल केला आहे.

आयपीएल २०२१ (IPL 2021) मधील साखळी फेरीतील शेवटच्या दोन्ही सामन्यांची वेळ बदलण्यात आली आहे. यापूर्वी ८ ऑक्टोबर रोजी होणारा सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना दुपारी ३.३० ला सुरु होणार होता. तर रॉयल चॅलेंजर बेंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हा सामना सायंकाळी ७.३० ला सुरु होणार आहे.

बीसीसीआयने अधिकृत वक्तव्याद्वारे दिली माहिती  ( IPL 2021 )

आपीएल संचालन परिषदेत घेतलेल्या निर्णयानुसार आता या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. दुपारी ३.३० ला होणारा सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना आता सायंकाळी ७.३० ला सुरु होणार आहे. बीसीसीआयने 'सध्या सुरु असलेल्या आयपीएलच्या साखळी फेरीतील अंतिम दिवशी म्हणजे ८ ऑक्टोबर २०२१ ला दुपारी होणारा सामना आता संध्याकाळी खेळला जाईल. आता सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर बेंगलोर हे दोन्ही सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० ला सुरु होणार आहे.' असे अधिकृत वक्तव्य प्रसिद्ध केले आहे.

आयपीएल २०२१ ( IPL 2021 ) सध्या महत्वाच्या टप्प्यात पोहोचले आहे. कोणता संघ प्ले ऑफमध्ये पोहोचेल याचा निर्णय येत्या काही दिवसातील सामन्यात होण्याची शक्यता आहे. सर्वात प्रथम प्ले ऑफमध्ये आपले स्थान पक्के करण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात चुरस पहावयात मिळत आहे.

हेही वाचले का?

[box type="shadow" align="" class="" width=""][visual_portfolio id="40771"][/box]

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT