नॉर्दर्न अलायन्‍सचे प्रमुख अहमद मसूद  (फाईल फोटो )  
आंतरराष्ट्रीय

तालिबानला तडाखा : ३५० दहशतवादी ठार, ४० हून अधिक जेरबंद केल्‍याचा नॉर्दन अलायन्‍सचा दावा

नंदू लटके

काबूल; पुढारी ऑनलाईन: अफगाणिस्‍तानमधून अमेरिकेच्‍या सैन्‍याने काढता पाय घेतल्‍यानंतर तालिबान्‍यांनी देशभरात धुमाकूळ घालण्‍यास सुरुवात केली आहे. मात्र पंजशीर प्रांतातील नॉर्दन अलायन्‍सने (उत्तर आघाडी) तालिबानला तडाखा दिला आहे.पंजशीर वर कब्‍जा करण्‍यासाठी गेलेल्‍या तालिबानला नॉर्दन अलायन्‍सने सडेतोड प्रत्‍युत्तर दिले आहे.

चकमकीत  तब्‍बल ३५० तालिबानी ठार झाले असून ४० हून अधिक जणांना ताब्‍यात घेतल्‍याचा दावा नॉर्दने अलायन्‍सने केला आहे. यापुढेही पंजशीरवर चाल करुन आल्‍यासह तालिबानला तडाखा दिला जाईल, असा निर्धारही त्‍यांनी व्‍यक्‍त केला आहे.

यासंदर्भात नॉर्दर्न अलायन्‍सने ट्‍विटरवर दिलेल्‍या माहितीनुसार, पंजशीरवर कब्‍जा करण्‍यासाठी मागील दोन दिवसांपासून तालिबान्‍यांनी प्रयत्‍न सुरु केले आहेत.

खावक परिसरात मंगळवारी तालिबान्‍यांनी हल्‍ला केला. नॉर्दर्न अलायन्‍सनेही सडेतोड प्रत्‍युत्तर दिले. यावेळी झालेल्‍या चकमकीत तब्‍बल ३५० दहशतवादी ठार झाले असून ४० हून अधिक जणांना ताब्‍यात घेण्‍यात आले आहे.

या हल्‍याचा व्‍हिडिओही नॉर्दर्न अलायन्‍सने प्रसारीत केला आहे.

यासंदर्भात स्‍थानिक पत्राक नातिक मालिकजादा यांनी ट्‍विट केले आहे की, पंजशीर प्रांतातील गुलबहार परिसरात तालिबानी आणि नॉर्दर्न अलायन्‍स यांच्‍यात जोरदार धुमश्‍चक्री उडाली.

तालिबान्‍यांचा हल्‍ला परतवून लावत नॉर्दर्न अलायन्‍सने तालिबानी तरुणांना ताब्‍यात घेतले आहे.

अहमद मसूदच्‍या नेतृत्‍वाखालील नॉर्दर्न अलायन्‍सने तालिबान्‍यांना सशर्ते चर्चेचा प्रस्‍ताव ठेवला होता.

तालिबान्‍यांनी चर्चेचा प्रस्‍ताव धुडकावत सोमवारी रात्री, पंजशीर प्रांतावर हल्‍ला केला होता.

या हल्‍ल्‍यातही तालिबानचे ७ दहशतवादी ठार झाल्‍याचा दावा नॉर्दर्न अलायन्‍सने केला होता.

अफगाणिस्‍तान ची सत्ता काबीज केल्‍यानंतर तालिबान्‍यांनी जनतेला वेठीस धरले आहे.

काबूलमध्‍ये निर्दयी कृत्‍य करत तालिबान्‍यांचा धुमाकूळ सुरु आहे.

अमेरिकेच्‍या सैनिकांनी अफगाणिस्‍तान सोडल्‍यानंतर संपूर्ण देशावर कब्‍जा करण्‍यासाठी तालिबानची धडपड सुरु आहे.

पंजशीर प्रांतावर नॉर्दन अलायन्‍सची सत्ता आहे. अलायन्‍सने तालिबानच्‍या सरकारचा विरोध केला आहे.

तसेच त्‍यामुळे आता पंजशीर प्रांतावर कब्‍जा करणे तालिबानसाठी मोठे आव्‍हान असणार आहे.

हेही वाचलं का ?

पाहा व्‍हिडिओ : एक एकर टोमॅटो शेतीसाठी खर्च किती आणि हातात मिळतात किती ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT