काबूल विमानतळावरील सुरक्षा व्‍यवस्‍थेत वाढ करण्‍यात आली आहे. 
आंतरराष्ट्रीय

अफगाणिस्‍तान : काबूल विमानतळावर चेंगराचेंगरीत सात जणांचा मृत्‍यू

नंदू लटके

काबूल ; पुढारी ऑनलाईन: अफगाणिस्‍तान मध्‍ये तालिबान्‍यांनी सत्ता काबीज केल्‍यानंतर काबूल विमानतळावर प्रचंड तणाव आहे. देश सोडण्‍यासाठी हजारो नागरिक विमानतळावर गर्दी करत आहे. रविवारी विमानतळावर चेंगराचेंगरी झाली. यामध्‍ये अफगाणिस्‍तान मधील सात नागरिकांचा जणांचा मृत्‍यू झाल्‍याची माहिती ब्रिटनच्‍या संरक्षण मंत्रालयाने दिली आहे.

अफगाणिस्‍तानमधील परिस्‍थिती अद्‍याप आव्‍हानात्‍मक आहे. आम्‍ही परिस्‍थिती नियंत्रणात राहण्‍यासाठी प्रयत्‍न करत आहोत, असेही ब्रिटनच्‍या संरक्षण मंत्रालयाने म्‍हटले आहे.

काबूल विमानतळावर हजारोच्‍या संख्‍येने नागरिक गर्दी करत आहेत. रविवारी नागरिकांची एकच गर्दी झाल्‍याने गोंधळ उडाला.

यावेळी झालेल्‍या चेंगराचेंगरीत सात अफगाणी नागरिकांचा मृत्‍यू झाला.

मागील आठवड्यात विमानतळ परिसरात झालेल्‍या गोळीबार ५ जणांचा मृत्‍यू झ्राला होता. मात्र हा गोळीबार कोणी केला याबाबतचा खुलासा तालिबान्‍यांनी केलेला नाही.

काबुलमधील गोंधळाच्‍या परिस्‍थितीमुळे नागरिकांना विमानतळावर गर्दी करु नये, असे आवाहन जर्मनी, स्‍विझर्लंड सरकारने आपल्‍या नागरिकांना केले आहे.

काबूलमध्ये अडकलेले १६८ भारतीय सुखरुप मायदेशी परतले

काबूल विमानतळावर अडकलेल्या 168 प्रवाशांना घेऊन येणारे सी -17 ग्लोबमास्टर विमान सुखरूप भारतात पोहोचले आहे. हे विमान सकाळी 10 च्या सुमारास गाझियाबादमधील हिंडन एअर बेसवर पोहोचले. या प्रवाशांमध्ये 24 अफगाण शीख देखील असल्याचे सांगितले जाते.

दोन अफगाणिस्तान खासदार म्हणजेच सिनेटचाही समावेश आहे. त्यामध्ये तालिबानच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या सिनेटर अनारकलीचाही समावेश आहे.

अफगाणिस्तानची राजधानी तालिबानच्या ताब्यात असलेल्या काबूलमधील भारतीय नागरिकांना घरी आणले जात आहे.

असुरक्षिततेचे वातावरण पाहता अनेक परदेशी नागरिकही भारतात आले आहेत.

यापूर्वी दिल्लीच्या आयजीआय विमानतळावर काबूलहून 3 उड्डाणे आली आहेत.

ही उड्डाणे दोहा, ताजिकिस्तानमार्गे भारतात आली आहेत. एक विमान विस्ताराचे, दुसरे एअर इंडियाचे आणि तिसरे विमान इंडिगोचे आहे.

सर्व पहाटे 4:30 ते 6 च्या दरम्यान आली आहेत. 250 भारतीय इंडिगो आणि एअर इंडिया फ्लाईटद्वारे आले आहेत.

माहितीनुसार, काबूलमधून भारतात येणाऱ्या सर्व प्रवाशांची आरटी-पीसीआर चाचणी केली जाईल.

यानंतरच प्रत्येकजण विमानतळाच्या बाहेर येऊ शकेल.

६८ प्रवाशांना घेऊन येणाऱ्या विमानापूर्वी आज सकाळी आणखी तीन उड्डाणे भारतात आली आहेत.

त्याचवेळी, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी एकापाठोपाठ एक ट्विट करून काबूलमधून बाहेर काढलेल्या भारतीयांची माहिती दिली. त्यांनी एक व्हिडीओ क्लिपदेखील पोस्ट केली आहे.

हेही वाचलं का ? 

पाहा व्‍हिडीओ :पारनेर तहसीलदार ज्योती देवरे यांच्या ऑडिओ क्लिपने राज्यभर खळबळ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT