ED च्या अधिकाऱ्यांनाही भाजपची भुरळ वरिष्ठ अधिकारी लवकरच कमळ हातात घेणार | पुढारी

ED च्या अधिकाऱ्यांनाही भाजपची भुरळ वरिष्ठ अधिकारी लवकरच कमळ हातात घेणार

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : ED च्या अधिकाऱ्यांनाही भाजपची भुरळ : सक्तवसुली संचालनालयाचे (ED) वरिष्ठ अधिकारी राजेश्वर सिंह लवकरच भाजपमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आयपीएस अधिकारी राजेश्वर सिंह हे भाजपच्या प्रमुख नेत्यांशी सातत्याने चर्चा करत आहेत.

ED च्या अधिकाऱ्यांनाही भाजपची भुरळ 

राजेश्वर सिंह त्यांच्या कार्यकाळात एअरसेल-मॅक्सिस, 2 जी स्पेक्ट्रम, कोळसा घोटाळा, कॉमनवेल्थ गेम्स घोटाळा आणि अगस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्यासारख्या अनेक हायप्रोफाईल प्रकरणांचा तपास झाला.

राष्ट्राला तुझी गरज : राजेश्वर सिंह यांची बहीण

आभा सिंह यांनी ट्विट करून लिहिले आहे की, देशसेवा करण्यासाठी अकाली निवृत्ती घेतल्याबद्दल ईडीमधील माझे भाऊ राजेश्वर यांचे खूप खूप अभिनंदन. देशाला तुमची गरज आहे.

राजेश्वर सिंह सध्या लखनौमध्ये सहसंचालक म्हणून कार्यरत आहेत. 2009 मध्ये ते उत्तर प्रदेशातून प्रतिनियुक्तीवर ईडीमध्ये सामील झाले. मात्र, आगामी विधानसभा निवडणूक लढवणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पी.चिदंबरम यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रकरणात राजेश्वर यांची महत्त्वाची भूमिका

राजेश्वर यांनी भ्रष्टाचार प्रकरणात माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम आणि त्यांचा मुलगा कीर्ती चिदंबरम यांच्याविरोधात तपास आणि कारवाईमध्ये महत्वाची भूमिका बजावली.

उत्तर प्रदेश राज्यातील सुल्तानपूर येथील रहिवासी असलेल्या राजेश्वर सिंह यांच्याकडे कायद्याची आणि मानवाधिकारांची पदवी आहे.

वर्ष 2018 मध्ये राजेश्वर यांच्याविरोधात चौकशी करण्यात आली.

परंतु, आजपर्यंत कोणत्याही अधिकाऱ्याला त्यांच्याविरूद्ध चुकीचे काम केल्याचे पुरावे सापडले नाहीत.

हे ही वाचलं का?

 

Back to top button