Kolhapur Crime : वरदच्या कुटुंबियांना जिल्हा पोलिस अधिक्षकांची भेट

वरदच्या कुटुंबियांना जिल्हा पोलिस अधिक्षकांची भेट
वरदच्या कुटुंबियांना जिल्हा पोलिस अधिक्षकांची भेट

सावर्डे बुद्रुक, पुढारी वृत्तसेवा : सोनाळी (ता. कागल) येथील खून (Kolhapur Crime) झालेल्या वरद रवींद्र पाटील या सात वर्षीय बालकाच्या घरी जिल्हा पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी भेट दिली.

यावेळी आरोपीला फाशी झाली पाहिजे. पंचांग पाहणार्‍या आरोपीच्या भावाला अटक झाली पाहिजे, आरोपीला फाशी देण्यासाठी चांगला सरकारी वकील नेमण्यात यावा, आरोपी मारुती वैद्यसारखा दुसरा मारूती पुन्हा जन्माला येऊ नये, यासाठी आरोपीला कडक शिक्षा व्हावी. अशी मागणी कुटुंबियांच्याकडून करण्यात आली.

या वेळी घटनेचा तपास करण्यासाठी दहा पथके काम करत असल्याचे श्री बलकवडे यांनी सांगितले. आरोपीला मरेपर्यंत फाशी होण्यासाठी आवश्यक तो तपास व पुरावे गोळा करण्याचे काम  सुरू आहे. वरदच्या कुटुंबियांसोबत अख्खे पोलिस दल आहे. चांगला सरकारी वकील मिळण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा विश्वास श्री बलकवडे यांनी दिला.

आरोपीला फाशीची शिक्षा (Kolhapur Crime) होण्यासाठी आवश्यक ते सर्व पुरावे गोळा करण्यासाठी कुटुंबियांनी तपासकार्यात योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहनही यावेळी श्री बलकवडे यांनी केले. तपासकामात कुटुंबियांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी गावातच कुटुंबियांचे व ग्रामस्थांचे जबाब घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी अप्पर पोलिस अधिक्षक तिरुपती काकडे, मुरगूडचे सहायक पोलिस निरीक्षक विकास बडवे, पोलिस नाईक स्वप्नील मोरे यांच्यासह पोलिस उपस्थित होते.

पहा व्हिडीओ : पारनेर तहसीलदार ज्योती देवरे यांच्या ऑडिओ क्लिपने राज्यभर खळबळ

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news