पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर.  Pudhari Photo
आंतरराष्ट्रीय

Asim Munir : युद्धपिपासू असीम मुनीर कोण आहेत? जाणून घ्‍या पाकिस्तानच्या वादग्रस्त लष्करप्रमुखांबद्दल

पहलगाम दहशतवादी हल्‍ल्‍यापूर्वी भारताविरोधात ओकली होती गरळ

पुढारी वृत्तसेवा

Asim Munir : 'काश्मीर ही पाकिस्तानच्या गळ्यातील नस आहे,' असे ते बरळले आणि अवघ्‍या काही दिवसांमध्‍येच जम्‍मू-काश्‍मीरमधील पहलगाममध्‍ये भ्‍याड दहशतवादी हल्‍ला झाला. निःशस्त्र आणि निष्पाप भारतीय नागरिकांना त्‍यांचा धर्म विचारुन गोळ्या झाडण्‍यात आल्‍या. पहलगाम दहशतवादी हल्‍ल्‍यामागे पाकिस्‍तानी लष्‍कर प्रमखी जनरल असीम मुनीर यांनी केलेले प्रक्षोभक भाषणही कारणीभूत होत, असे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांच्यासह भारतीय अधिकाऱ्यांनी स्‍पष्‍ट केले आहे. मुनीर यांच्‍या चिथावणीखोर भाषणामुळेच पहलगाममध्ये निष्पाप पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झााला आणि त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे. असे असताना पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांना अमर्याद अधिकार बहाल केले आहेत. जाणून घेवूया, पाकिस्तानच्या वादग्रस्त लष्कर प्रमुख असीम मुनीर यांच्‍याविषयी...

मदरशामध्‍ये शिक्षण ते गुप्‍तचर संस्‍थांचे प्रमुख

पाकिस्‍तान हा देश अस्‍तित्‍वात येवून आता ७७ वर्ष झाली आहेत. या ७७ वर्षांपैकी तब्‍बल ३३ वर्ष या देशात मार्शल लॉ लागू करण्‍यात आला . यावरुन या देशावर असणारी लष्‍करशाहीची पकड स्‍पष्‍ट होते. असीम मुनीर यांनी गॅरिसन शहरातील एका मदरशामध्ये शिक्षण घेतले. यानंतर त्यांना पाकिस्तान मिलिटरी अकॅडमीतून नव्हे, तर ऑफिसर्स ट्रेनिंग स्कूल (OTS) मधून ते लष्‍करात आले. १९८६ मध्‍ये आपली कारकिर्दीला सुरुवात केलेल्‍या मुनीर यांना २०१४ मध्ये त्यांना मेजर जनरल पदावर बढती देण्यात आली. जनरल कमर जावेद बाजवा निवृत्त झाल्‍यानंतर ते २०२२ मध्‍ये पाकिस्‍तानचे लष्‍कर प्रमुख झाले. ते पाकिस्तानच्या इतिहासातील एकमेव लष्करप्रमुख आहेत ज्यांनी पाकिस्तानच्या दोन्ही प्रमुख लष्करी गुप्तचर संस्थांचे, म्हणजेच इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंस (आयएसआय. आणि मिलिटरी इंटेलिजेंसचे (एमआय) प्रमुख म्हणून काम पाहिले आहे.

लष्‍कराला धर्म मानणारा ‘जिहादी' जनरल

भारतासाठी चिंतेची बाब म्हणजे मुनीर यांनी लष्कर प्रमुख झाल्यानंतर लष्‍करात धार्मिक राष्ट्रवादाची पेरणी सुरु केली. त्यांनी लष्कराच्या भूमिकेला फक्त पाकिस्तानच्या भौगोलिक अखंडतेचे रक्षण करणारेच नव्हे तर देशाच्या वैचारिक सीमांचे रक्षण करणारे असल्‍याचे सांगितले . ऑगस्ट २०२३ मध्ये पेशावरमध्ये एका आदिवासी जिरगाला (परिषद) संबोधित करताना मुनीर म्‍हणाले होते की, “ जगातील कोणतीही ताकद पाकिस्तानला धक्‍का देवू शकत नाही. आम्ही अल्लाहच्या मार्गावर जिहाद (पवित्र युद्ध) करत आहोत आणि यश आमचंच होणार आहे. पाकिस्तानी लष्कराचं उद्दिष्ट आणि तत्त्वज्ञान म्हणजे शहीद किंवा गाझी (जिहादमध्ये सहभागी होणारा) बनणं आहे.” त्यांच्या या घोषणेमुळे त्यांना ‘जिहादी जनरल’ असा टोपणनाव मिळालं आहे.

राजकारणात हस्तक्षेप करणारा लष्‍कर प्रमुख

लष्करप्रमुख असूनही पाकिस्तानच्या राजकीय व्‍यवस्‍थेत हस्तक्षेप केल्याबद्दल मुनीर यांच्यावर वारंवार तीव्र टीका झाली आहे.माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) पक्षाचे राजकीय अस्‍तित्‍वच संपवल्‍याचा आरोप त्‍यांच्‍यावर आहे.

नागरिकांवर दाखल केले लष्करी कायद्यानुसार खटले

९ मे २०२३ रोजी इम्रान खान यांच्या अटकेनंतर झालेल्या दंगलीप्रकरणी सामान्य नागरिकांवर लष्करी न्यायालयात खटले भरले गेले. मुनीर यांनी पाकिस्तान आर्मी अ‍ॅक्ट आणि ऑफिसियल सिक्रेट्स अ‍ॅक्ट अंतर्गत सामान्य नागरिकांवर लष्करी न्यायालयात खटले भरले. या कारवाईवर मानवाधिकार संघटनांनी तीव्र निषेध केला. यानंतर ही कारवाई पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने घटनाबाह्य मानली. मात्र आज (दि. ९ मे) पुन्‍हा एकदा पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने लष्करी न्यायालयांमध्ये नागरिकांवर खटले चालविण्यास मान्यता देत एक ऐतिहासिक निर्णय दिला आहे. यामुळे पाकिस्तानमध्ये लोकशाही दडपून टाकणाऱ्या लष्करी स्थापनेला मोकळीक मिळू शकते, अशी भीती व्‍यक्‍त होत आहे.

अफगाण निर्वासितांवर केली अमानूष कारवाई

मुनीर यांनी अफगाण निर्वासितांना हद्दपार करण्‍याच्‍या मोहिमच राबवली. यामुळे कठोर टीका झाली, विशेषतः पाकिस्‍तानच्‍या लष्‍कराने केलेल्‍या कारवाईमुळे झालेली निर्वासित अफगाणी नागरिकांचे झालेली हालअपेष्टा, त्‍यांच्‍यावर झालेल्‍या अमानूष कारवाईचे आंतरराष्‍ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय ठरली होती.

भारतावर दहशतवादी हल्‍लाचा कट रचणारा अधिकारी

२०१९ मधील पुलवामा हल्ल्याच्या वेळी मुनीर हे पाकिस्‍तानची गुप्‍तचर संस्‍था ISI प्रमुख होते. आता २०२५ मधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे सूत्रधार असल्याचा आरोप आहे. या हल्ल्यापूर्वी त्यांच्या केलेल्या भडक वक्तव्यांना या दहशतवादी कारवायांशी जोडले जात आहे.

भारताविराेधात ओकली गरळ, काश्मीरबाबत प्रक्षोभक विधान

'काश्मीर ही पाकिस्तानच्या गळ्यातील नस आहे,' असे विधान मुनीर यांनी एप्रिल २०२५ मध्ये केले. तसेच हिंदू आणि मुस्लिमांमधील धार्मिक-सांस्कृतिक फरक करत ‘व्‍दि राष्ट्र सिद्धांत’चा पुन्‍नरुच्‍चार केला. त्‍यांचे हे प्रक्षोभक विधानामुळेच पहलगामध्‍ये पर्यटकांवर भ्‍याड दहशतवादी हल्‍ला झाला.

असीम मुनीर हुकूमशहा : अमेरिकेचे खासदार रो खन्‍ना

आंतरराष्ट्रीय स्तरावरूनही असीम मुनीर यांच्‍या दडपशाहीवर तीव्र टीका झाली आहे. अमेरिकेचे खासदार रो खन्ना यांनी लोकशाही समर्थक कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांना लक्ष्य केल्याबद्दल मुनीर यांच्यावर निर्बंध घालण्याची मागणी केली आहे. अमेरिकेतील आंतरराष्‍ट्रीय प्रश्‍नांचे विश्लेषक मायकेल कुगेलमन यांनीही मुनीर यांच्या वाढलेल्या कार्यकाळामुळे लष्कराच्या सत्तेचा अतिरेक लोकशाहीस मारक ठरत असल्‍याचे असल्याचे म्हटले. तर मायकेल रुबिन यांनी पहलगाम हल्ल्यानंतर मुनीर यांची तुलना थेट ओसामा बिन लादेनशी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT