Pahalgam Terror Attack | पहलगाम दहशतवादी हल्‍ल्‍यावर 'या' मुस्‍लिम देशाने पाकिस्‍तानला दाखवला आरसा... शस्‍त्र सोडून...

जम्‍मू काश्मीरच्या पहलगाममधील हल्‍ल्‍याचा केला निषेध
indonesian president prabowo subianto
Pahalgam Terror Attack | पहलगाम दहशतवादी हल्‍ल्‍यावर 'या' मुस्‍लिम देशाने पाकिस्‍तानला दाखवला आरसाFile Photo
Published on
Updated on

indonesian president prabowo subianto on kashmir terror attack

जकार्ता : पुढारी ऑनलाईन

जम्‍मू काश्मीरच्या पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्‍या दहशतवादी हल्‍ल्‍यावर जगभरातून शोक संवेदना व्यक्‍त करण्यात येत आहे. तसेच दहशतवादाविरूद्धच्या भारताच्या लढाईत सोबत असल्‍याची भूमिका अनेक देशांनी व्यक्‍त केली आहे. इंडोनेशियाचे राष्‍ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांनी पाकिस्तानला आरसा दाखवत शस्‍त्र सोडून चर्चेतून मार्ग काढण्याचा सल्‍ला दिला आहे.

indonesian president prabowo subianto
Pahalgam Terrorist Attack: पहलगाम हल्ल्याबाबत NIAच्या प्राथमिक अहवालातून धक्कादायक खुलासा

काश्मीर दहशतवादी हल्ल्याबद्दल तीव्र शोक व्यक्त

इंडोनेशियातील भारतीय राजदूतांना भेटल्यानंतर सुबियांतो यांनी काश्मीर दहशतवादी हल्ल्याबद्दल तीव्र शोक व्यक्त केला. या दरम्यान, प्रबोवो यांनी पाकिस्तानचे नाव न घेता त्याला एक मोलाचा सल्‍ला दिला. इंडोनेशियन राष्‍ट्राध्यक्ष म्हणाले की, इस्लाम आपल्या देशात हे शिकवत नाही.

जम्‍मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्‍या दहशतवादी हल्‍ल्‍यात १९ भारतीयांचा जीव गेला होता. या घटनेची मस्‍लिम देश इंडोनेशियाने निंदा केली आहे. तसेच राष्‍ट्राध्यक्ष सुब्रितांयो यांनी पाकिस्‍तानला आरसा दाखवला आहे. सुबियांतो यांनी इंडोनेशियातील भारताच्या राजदुतांशी चर्चा केली. यावेळी त्‍यांनी काश्मीर पहलगाम घटनेवर शोक व्यक्‍त केला. यावेळी सुब्रीयांतो यांनी पाकिस्‍तानचे नाव न घेता एक सल्‍ला दिला. इंडोनेशियाचे राष्‍ट्रपती म्‍हणाले, इस्‍लाम आपल्‍याला असे शिकवत नाही.

indonesian president prabowo subianto
26/11 terrorist attack : दहशतवादी हाफिज सईदचे नेटवर्क अजूनही भारताविरुद्ध सक्रिय, NIA ने दिली माहिती

दहशतवादाविरुद्ध लढाईत सहकार्याची भूमिका

लोकशाहीमध्ये नियंत्रित लष्करी प्रभावाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. पहलगाममधील या दहशतवादी हल्ल्याचा प्रबोवो यांनी तीव्र निषेध केला. दोन्ही नेत्यांनी दहशतवादाविरुद्ध सहकार्य वाढविण्यावरही सहमती दर्शविली.

इस्लाम दहशतवादी हल्ले शिकवत नाही

इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो म्हणाले की, इस्लाम अशा प्रकारचे दहशतवादी हल्ले करण्याचे शिकवत नाही. काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याबद्दल आपले मत व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, इंडोनेशियामध्ये प्रचलित असलेल्या इस्लामच्या शिकवणीत अशा दहशतवादी हल्ल्यांना स्थान नाही. त्यांनी इंडोनेशियातील भारतीय राजदूत संदीप चक्रवर्ती यांना हे सांगितले. अशा दहशतवादाचे कोणतेही परिणाम निघू शकत नाहीत, असे ते म्हणाले. म्हणून, शस्त्रांशिवाय संवादाचा मार्ग निवडला पाहिजे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news