अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष डोनाल्‍ड ट्रम्‍प.  File Photo
आंतरराष्ट्रीय

Donald Trump | "दोन्‍ही देश युद्ध करणार असतील तर..." : भारत-पाक तणावावर ट्रम्‍प नेमकं काय म्‍हणाले?

आम्‍ही भारतासोबत करार करण्‍याच्‍या अगदी जवळ पोहोचला आहोत

पुढारी वृत्तसेवा

भारत आणि पाकिस्‍तानमध्‍ये सुरु असणार्‍या तणावावर अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष डोनाल्‍ड ट्रम्‍प (Donald Trump) यांनी पुन्‍हा एकदा मोठे विधान केले आहे. भारत -पाकिस्‍तान यांच्‍यातील युद्धविराम हा अमेरिकेने मध्‍यस्‍थी केल्‍याने झाला होता, असा दावा करणार्‍या ट्रम्‍प यांनी आता सर्व काही दोन्‍ही देशांवरच अवलंबून असल्‍याचे अप्रत्‍यक्षरित्‍या मान्‍य केले आहे.

संभाव्य अणुयुद्ध रोखू शकलो : ट्रम्‍प

एअर फोर्स वनवरून उड्डाण केल्यानंतर ट्रम्प यांनी जॉइंट बेस अँड्र्यूज येथे बोलताना स्‍पष्‍ट केले की, पाकिस्तान आणि भारतामध्ये एक अतिशय धोकादायक संभाव्य युद्ध सुरू होते. कोणीही याबद्दल बोलत नाही. परंतु आता परिस्थिती ठीक आहे. अमेरिका भारत आणि पाकिस्तानसोबत व्यापार करार करणार आहे. मला याचा अभिमान आहे. आम्ही गोळ्यांऐवजी व्यापाराद्वारे संभाव्य अणुयुद्ध रोखू शकलो.

... तर अमेरिका कोणताही करार करणार नाही

पाकिस्तानचे प्रतिनिधी पुढील आठवड्यात अमेरिकेत येत आहेत. आम्ही भारतासोबतही करार करण्याच्या अगदी जवळ आहोत. भारत-अमेरिका २५ जूनपर्यंत अंतरिम व्यापार करारावर पोहोचण्याची अपेक्षा आहे. मात्र भारत आणि पाकिस्‍तान जर एकमेकांशी युद्ध करणार असतील तर मला कोणाशीही करार करण्यात रस नाही. दोन्‍ही देश युद्ध करणार असतील आम्‍ही मध्‍यस्‍ती करणार नाही. तसेच दोन्‍ही देशांबरोबर कोणताही करार करणार नाही.

उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केला वॉशिंग्टन दौरा

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुल्काच्या घोषणेनंतर, भारत आणि अमेरिकेमध्ये व्यापार करारावर चर्चा सुरू आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की, भारत आणि अमेरिका यांच्यात २५ जूनपर्यंत अंतरिम व्यापार करार होऊ शकतो. व्यापार चर्चेला गती देण्यासाठी वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल देखील गेल्या आठवड्यात वॉशिंग्टनमध्ये होते. या दरम्यान त्यांनी अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांची दोनदा भेट घेतली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT