

Donald Trump
अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष निवडणूक झाली आणि जगभरात डोनाल्ड ट्रम्प हे नाव चर्चेत येवू लागले. त्यांचे आयात शुल्काबाबतचे धडाकेबाज निर्णय असोत की जगभरातील विविध देशांना धमकी देणे असो, ट्रम्प हेच आंतरराष्ट्रीयत पातळीवर चर्चेत राहिले. मात्र आता त्यांनी सर्वच हद्द ओलांडली आहे. त्यांनी चक्क ख्रिश्चन धर्मियांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप या पदाची खिल्ली उडवली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्वतःचा एक फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो एआय जनरेटेड आहे. यामध्ये ट्रम्प ख्रिश्चनांचे सर्वोच्च धार्मिक नेते पोपच्या वेशभूषेत दिसत आहेत. पोप फ्रान्सिस यांचे गेल्या आठवड्यात निधन झाले आहे. ख्रिश्चन बांधव दुःखी असताना ट्रम्प यांनी स्वतःलाच पोप पोस्ट केलेल्या फोटोमुळे संताप व्यक्त केला जात आहे.
मला पोप व्हायचे आहे, असे काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं होते. त्यांनी हे विनोदाचे अंगाने म्हटलं असावे, असेच सर्वांनीनामले. मात्र आता त्यांनी चक्क पोप यांच्या वेषभूषेतील एनआय जनरेटेड फोटो पोस्ट करुन नवा वाद निर्माण केला आहे. त्यांचा हा फोटो ख्रिश्चन धर्मियांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप यांची खिल्ली उडविण्यासाठीच असल्याच्या प्रतिक्रिया दिला जात आहे. ट्रम्प समर्थकांनी नेहमीप्रमाणे त्यांच्या या कृतीचे समर्थन केले आहे. तर काहींनी त्यांच्या या कृतीवर संताप व्यक्त केला आहे. हा कॅथोलिक ख्रिश्चनांचा अपमान आहे, असे एका युर्जसने म्हटले आहे. तर काहींनी या कृतीला ईश्वराची निंदा अशीही टीका केली आहे. दरम्यान, व्हॅटिकन सिटीमध्ये लवकरच नवीन पोप निवडण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पोप फ्रान्सिस यांनी त्यांच्या समलैंगिक समुदाय आणि बेकायदेशीर स्थलांतरितांविरुद्ध घेतलेल्या निर्णयावर टीका केली होती. तसेच २०१६ मधील अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकवेळी ट्रम्प यांनी अमेरिका आणि कॅनडाच्या सीमेवर भिंत बांधण्याचा प्रस्ताव दिला होता. या निर्णयावरही पोप फ्रान्सिस यांनी अप्रत्यक्ष टीका केली होती. एक व्यक्ती पूल नव्हे तर भिंत बांधण्याचा विचार करत आहे. अशी व्यक्ती ख्रिश्चन नाही. ट्रम्प यांनीही पोप यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली होती. २०१७ मध्ये ट्रम्प यांनी व्हॅटिकनला भेट दिली होती. यावेळी त्यांनी पोप फ्रान्सिस यांच्याबरोबर चर्चा केली होती.