

पुढारी ऑनलाईन डेस्क : "केवळ धमकी देणे याला काहीही किंमत नाही. इस्रायलमधील ओलिसांच्या सुटकेसाठी इस्रायल आणि हमासमधील युद्धबंदीचा आदर करणे हा एकमेव मार्ग आहे, हे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे लक्षात ठेवावे, " असे प्रत्युत्तर हमासने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दिले आहे. ( Israeli-Hamas Ceasefire)
"ट्रम्प यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, युद्धबंदी एक करार आहे. याचा दोन्ही बाजूंनी आदर केला पाहिजे. ओलिसांना कैद्यांना परत आणण्याचा हा एकमेव मार्ग आहे. धमक्यांच्या भाषेला काहीही किंमत नाही आणि ते केवळ प्रकरणे गुंतागुंतीचे करतात," असे हमासचा हस्तक सामी अबू झुहरी यांनी मंगळवारी रॉयटर्सला सांगितले.
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते की, शनिवारी दुपारपर्यंत गाझामध्ये ओलीस ठेवलेल्या सर्व ७३ जणांना सोडण्यात यावे. मी म्हणेन, सर्व नरक फुटणार आहे. आम्ही इस्रायल-हमास युद्धविराम संपवून हमासला संपवण्याचा प्रस्ताव देवू. तसेच जॉर्डन आणि इजिप्तने गाझामधून पॅलेस्टिनी निर्वासितांना घेण्यास नकार दिला तर ते त्यांना मिळणारी मदत थांबवली जाईल. यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हमासविरुद्ध बदला घेण्याचे संकेत देत आहेत का, या सवालवर ट्रम्प म्हणाले, "तुम्हाला कळेल, हमासला कळेल की मी काय म्हणायचे आहे त्यांना शनिवारी दुपारी १२ वाजता माझा अर्थ काय आहे हे कळेल."
अमेरिकेसोबत कतार आणि इजिप्तने या करारात मध्यस्थी केली आहे. या कराराच्या पहिल्या टप्प्यांतर्गत, ४२ दिवसांच्या कराराच्या पहिल्या टप्प्यात सोडण्यात येणाऱ्या ३३ ओलिसांपैकी १६ जणांची सुटका करण्यात आली आहे. पाच थाई ओलिसांनाही सोडण्यात आले आहे. इस्रायलने त्या बदल्यात शेकडो कैदी आणि बंदिवानांना सोडले आहे. आता हमासच्या आरोपानंतर आणि इस्त्रायलनेही त्याला प्रत्युत्तर देण्याची तयारी सूरु केल्याने मध्यस्थांना युद्धबंदी करार मोडण्याची भीतीही व्यक्त होत आहे.