Russia-Ukraine war | 'हे काय चाललंय... ही तर रशियाच्या पतनाची सुरुवात ठरेल' : पुतिन यांच्‍यावर ट्रम्‍प भडकले

पुतिन यांना नेमकं काय झालंय माहित नाही, त्‍यांचे वर्तन अत्‍यंत बेजबाबदार
Russia-Ukraine war
अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष डोनाल्‍ड ट्रम्‍प.Pudhari Photo
Published on
Updated on

Russia-Ukraine war :"रशियाचे राष्‍ट्राध्‍यक्ष व्लादिमीर पुतिन यांना मी खूप वर्षांपासून ओळखतो. आमचे नेहमीच चांगले संबंध राहिले आहे. रशिया आणि युक्रेन युद्ध थांबविण्‍यासाठी आम्‍ही मध्‍यस्‍थी करण्‍याचा प्रयत्‍न करत आहोत. मात्र पुतिन यांना नक्की काय झालंय हे मला काय झालयं ! ते युक्रेनची राजधानी कीव्‍हसह अन्‍य शहरांवर क्षेपणास्‍त्र मारा करत खूप लोकांना ठार मारत आहेत. त्यांना संपूर्ण युक्रेन हवे असेल तर ते रशियाच्या पतनास कारणीभूत ठरतील, असा इशारा अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष डोनाल्‍ड ट्रम्‍प यांनी दिला आहे. शनिवारी रात्रीपासून रशियाने युक्रेनवर सर्वात मोठा हवाई हल्ला केल्यानंतर न्‍यू जर्सीमधील मॉरिसटाऊन विमानतळावर ते माध्‍यमांशी बोलत होते.

'आजवर नेहमीच पुतिन यांच्‍याशी तडजोडीची भूमिका घेतली'

शनिवारी (दि. २४ मे) रात्री रशियाने युक्रेनची राजधानी कीव्‍हसह अन्‍य शहरांवर ३६७ ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यात १३ जण झाले. तर अनेक जण जखमी झाले. ४५ क्षेपणास्त्रे पाडल्याचा आणि २६६ ड्रोन नष्ट केल्याचा दावा युक्रेनच्‍या हवाई दलाने केला आहे. या हल्‍ल्‍यावर बोलताना पुतिन म्‍हणाले की, पुतिन यांना नेमकं काय झालंय हे मला माहिती नाही. मी त्‍यांना मागील काही वर्षांपासून ओळखतो. आजवर नेहमीच मी त्‍याच्‍याबरोबर तडजोडीची भूमिका घेतली आहे;पण आता ते थेट हवाई हल्‍ला करत युक्रेनमधील नागरिकांना ठार मारत आहे. मला हे अजिबात आवडलेले नाही.

Russia-Ukraine war
रशियाचा युक्रेनवर आजवरचा सर्वात माेठा क्षेपणास्त्र हल्‍ला, ४१ नागरिक ठार
Pudhari

'पुतिन वेड लागल्‍यासारखं वागत आहेत'

रशिया आणि युक्रेन युद्‍ध थांबविण्‍यासाठी आम्‍ही मध्‍यस्‍थी करण्‍याचा प्रयत्‍न करत आहोत. अशावेळी पुतिन हे युक्रेनवर हवाई हल्‍ला करत आहेत. त्‍याचे हे वर्तन मला अजिबात आवडलेले नाही. त्यांना संपूर्ण युक्रेन हवे असेल तर ते रशियाच्या पतनास कारणीभूत ठरतील, असा इशाराही ट्रम्‍प यांनी दिला आहे. दरम्‍यान, ट्रुथ सोशल मीडियावरील पोस्‍टमध्‍येही ट्रम्‍प यांनी युक्रेनमधील शहरांवरील हवाई हल्‍ल्‍याबाबत चिंता व्‍यक्‍त केली आहे. तसेच पुतिन वेड लागल्‍यासारखं वागत असल्‍याचे टीकाही केली आहे.

Russia-Ukraine war
Golden Dome : अमेरिका अंतराळात बसवणार क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणा; 500 अब्ज डॉलर खर्च, रशिया-चीनने दर्शविला विरोध

अमेरिकेचे मौन पुतिन यांना प्रोत्साहन देते : झेलेन्स्की

यापूर्वी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले होते की, "अमेरिकेने आम्‍हाला दिलेला प्रतिसाद हा अत्‍यत निराश करणार आहे. जग सुट्टीवर जाऊ शकते, परंतु युद्ध सुरूच आहे.शनिवार व रविवार आणि आठवड्याचे दिवस रशिया आमच्‍यावर हल्‍ला करत आहे. कडे दुर्लक्ष करता येणार नाही. अमेरिकेचे मौन पुतिन यांना प्रोत्साहन देते आहे. जागतिक दबाव येत नाही तोपर्यंत रशिया युक्रेनवर हल्‍ले करतच राहिल."

Russia-Ukraine war
रशिया-चीनचा चंद्रावर अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याचा करार

ट्रम्‍प यांच्‍या शांतता प्रयत्‍नांना धक्‍का

युद्धबंदीचा प्रयत्न करणाऱ्या ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात पुतिन यांच्याशी चर्चा केली होती. दोघांमध्‍ये फोनवर सुमारे दोन तास चर्चा झाली. यानंतर ट्रम्‍प यांनी झेलेन्स्की यांच्याशीही संवाद साधला होता. तुर्कीमध्ये नियोजित शांतता बैठकीला पुतिन गैरहजर राहिल्‍यानंतर ट्रम्‍प यांच्‍या शांतता प्रयत्नांना धक्का बसला. रशियाने संघर्ष संपवण्यात फारसा रस दाखवला नाही आणि वरिष्ठ नेत्यांच्या आवाहनाला न जुमानता त्यांनी आपले हल्ले सुरुच ठेवल्‍याने रशिया-युक्रेन रक्‍तरंजित संघर्ष चिघळण्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news