आंतरराष्ट्रीय

US : कोरोनामुळे पस्तीशीच्या आतील तरुणांची ‘सेक्स’ची इच्छा झालीय कमी

backup backup

कोरोना महामारीचा आणि सातत्याने पडणाऱ्या टाळेबंदीमुळे प्रत्येक क्षेत्रात जबरदस्त परिणाम झाला आहे. त्यातून माणसाचं लैंगिक आयुष्यही सुटू शकलेलं नाही. अमेरिका (US) येथे नुकत्याच झालेल्या संशोधनात असं आढळून आलं आहे की, मागील पिढीच्या तुलनेत ३५ वर्षांच्या आतील तरूणांनी सेक्स कमी केलेला आहे. संशोधनात त्याचे वर्णन 'सेक्स रिसेशन' असं करण्यात आलं आहे.

अमेरिका (US) येथील इन्स्टिट्यूट फाॅर फॅमिली स्टडीज या संस्थेने हे संशोधन केलेले असून त्यांच्या म्हणण्यानुसार २००८ आणि २०२१ या कालावधीत तरूणांचे सेक्स न करण्याचे प्रमाण ८ टक्क्यांवरून २१ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. तर, मागील वर्षी १८ ते ३५ वर्षांच्या तरुणींनी सेक्सच केलेला नाही. तरुणांच्या सेक्स लाईफवर कोरोना महामारी आणि लाॅकडाऊनचा परिणाम सर्वांत जास्त झालेला आहे.

३५ वर्षांच्या आतील तरुणांनी सेक्स नाकारला आहे. तर, २०१० पासून केलेल्या संशोधनात असं आढळून आलं आहे की, लग्नापूर्वी पस्तीशीच्या आतील तरुण-तरुणींना सेक्स केला नाही, असं सांगितलं आहे. २०२१ मध्ये ५ टक्के विवाहित तरुणांनी सेक्स केला नसल्याचे सांगितले आहे. तर, २९ टक्के तरुणांनी विवाहित नसल्यामुळे सेक्स न केल्याचे सांगितले आहे. अविवाहित असणं हेदेखील सेक्स कमी होण्यामागील कारण आहे, असंही अभ्यासात आढळलं आहे.

मागील १५ वर्षांमध्ये ३५ वर्षांच्या आतील ७० टक्के अविवाहित तरुण आपल्या लैंगिक आयुष्याबद्दल स्थिर आहेत, ३० टक्के तरुण सेक्सला नापसंती दर्शवली आहे. सेक्स नाकारण्यामागे धार्मिक वर्तन महत्वाचे ठरले आहे. त्यातून लिंगहिनता वाढीस लागली आहे, असंही अहवालात म्हंटलं आहे. कारण, विवाहापूर्वी लैंगिक संबंध ठेवणे धार्मिकदृष्ट्या गैर मानले जाते, त्यामुळे सेक्स न करण्याचे प्रमाण वाढले आहे.

३५ वर्षांच्या आतील तरुणांमध्ये खासगी आयुष्यातील सेक्स नाकारण्यामागे धार्मिक रुढी आणि परंपरा यांचा सर्वांत मोठा वाटा आहे. २००८ पासून धर्माला जास्त मानणाऱ्या पस्तीशीतील तरुणांनी सेक्स नाकारण्याचे प्रमाणे हे चक्क २० टक्क्यांवरून २०२१ पर्यंत ६० टक्क्यांवर वाढलेले आहे. त्यात लिंगहिनता १० टक्क्यांवरून २० टक्क्यांपर्यंत वाढलेले आहे.

महत्त्वाचे मुद्दे…

१) दारू पिणे कमी झाल्याने अनैसर्गिक सेक्स करण्याचे प्रमाण कमी होते.

२) बेरोजगार आणि कमी उत्पन्न असलेल्या तरुणांमध्ये सेक्स कऱण्याचे प्रमाण कमी असते.

३) सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तरुणांमध्ये सेक्स कमी होण्यामागे सोशल मीडियाचा अतिवापर हेदेखील कारण आहे.

४) त्याचबरोबर सेक्सच्या आनंदापेक्षा नेटफ्लिक्स, गेमिंग आणि सोशल मीडियाचा वापर केल्यामुळे त्वरीत आनंद मिळतो, असंही तरुणांना वाटत आहे.

एकंदरीत काय, तर… तरुणांनी आपली सेक्सच्या इच्छेचे रुपांतर 'सेक्स रिसेशन'मध्ये झालेले आहे. हा नवा ट्रेण्ड कोरोना महामारीमुळे आणि लाॅकडाऊनमुळे निर्माण झालेला आहे.

पाहा व्हिडीओ : अशी धावली रस्त्यांवर पहिल्यांदा आपली लालपरी !!!

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT