Saif al‑Islam Gaddafi assassinated pudhari photo
आंतरराष्ट्रीय

Saif al‑Islam Gaddafi assassinated: लिबिया पुन्हा 'ताब्यात' घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या माजी हुकूमशहा गद्दाफीच्या मुलाची हत्या

Anirudha Sankpal

Saif al‑Islam Gaddafi assassinated: लिबियाचा माजी हुकूमशहा मुअम्मर गद्दाफीचा दुसऱ्या क्रमांकाचा मुलगा सैफ-अल-इस्लाम-गद्दाफी याची मंगळवारी (दि. ३ फेब्रुवारी) हत्या करण्यात आली. याबाबतची माहिती लिबियाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. सैफ-अल-इस्माल-गद्दाफी हा ५३ वर्षाचा होता. त्याच्याकडे हुकूमशहा गद्दाफीचा राजकीय वारसदार म्हणून पाहिले जात होते.

चार मास्क घातलेले माराकेरी आले अन्

लिबियन मीडिया, सैफचे वकील खालेद-अल-झायदी यांनी सैफ-अल-इस्माल यांची झिंटान इथं राहत्या घरी हत्या झाल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे. सैफ यांच्या पॉलिटिकल टीमकडून प्रसिद्ध केलेल्या वक्तव्यानुसार, चार मास्क घातलेले शसस्त्र सैफ यांच्या घरात घुसले होते. त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा निकामी केले अन् त्यांनी सैफ यांची ओळख पटवल्यानंतर गोळ्या झाडून हत्या केली. यानंतर लिबियातील प्रशासनानं याचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत.

वडिलांच्या काळात महत्वाचे नेते

सैफ-अल-इस्लाम याला त्याची वडील गद्दाफी यांचा वारसदार समजलं जात होतं. गद्दाफी यांनी ४० वर्षे लिबियावर राज्य केलं होतं. त्यानंतर २०११ मध्ये नाटोच्या सैन्यानं त्यांना अटक करून त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली होती.

सैफ हे २०११ पूर्वी लिबिया सरकारमध्ये उच्च पदस्थ होते. ते सुधारणावादी होते. मात्र त्यांनी आपल्या विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी दमनशाहीचा वापर केला होता.

मृत्यूदंडाची शिक्षा मात्र..

सैफ यांचे वडील गद्दाभी यांची सत्ता गेल्यानंतर सैफ यांना देखील अटक करण्यात आलं होतं. त्यांना झिंटान इथं अनेक वर्ष ठेवण्यात आलं. २०१५ मध्ये लिबियाच्या कोर्टानं त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. मात्र ते झिंटालमध्येच रहात होते. आंतरराष्ट्रीय न्यायालयानं २०११ मध्ये त्यांच्याविरूद्ध अटक वॉरंट जारी केलं होतं.

पुन्हा लिबिया ताब्यात घेण्याची होती तयारी

मात्र २०१७ मध्ये त्यांना त्यांच्या शिक्षेतून क्षमा मिळाली होती अन् त्यांची बंदीवासातून मुक्तता झाली होती. दरम्यान, सैफ-अल-इस्लाम यांचा लिबियाच्या राजकीय वर्तुळात पुन्हा उदय होत होता. २०१२ मध्ये त्यांनी अध्यक्षपदासाठी आपली उमेदवारी देखील जाहीर केली होती. मात्र राजकीय दुफळीमुळे निवडणुकाच पुढे ढकलण्यात आल्या. त्यानंतर लिबियाच्या निवडणूक प्रशासनानं त्यांना अपात्रच केलं होतं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT