

India - US Trade Deal: भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करार फायनल झाला आहे. गेल्या १० महिन्यांपासून टॅरिफवरून गदारोळ सुरू असताना अखेर अमेरिका आणि भारत या दोन देशांनी आपापसातला व्यापार करार निश्चित केला असून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावेला टॅरिफ थेट १८ टक्क्यांपर्यंत आणत मोठा दिलासा दिला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी ही घोषणा करताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांना माझे प्रीय मित्र म्हणत ट्विट केलं. दरम्यान, भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराची डील डन करण्यात एका व्यक्तीचा मोलाचा वाटा असल्याचं मानलं जात आहे. ही व्यक्ती म्हणजे अमेरिकेची भारतातील राजदूत सर्जियो गोर आहे. त्यांनी १२ जानेवारी २०२६ मध्ये पद सांभाळल्यानंतर दोन्ही देशातील चर्चेला वेग आला होता. (United States Ambassador to India)
अमेरिकेने पहिल्यांदा गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात भारतावर २५ टक्के टॅरिफ लावलं होतं. त्यानंतर भारतावर रशियाकडून तेल खरेदी करून युक्रेन युद्धाला अप्रत्यक्षरित्या रसद पुरवत असल्याचा आरोप अमेरिकेने केला अन् २५ टक्के पेनाल्टी लादली. यामुळे भारतावर एकूण ५० टक्के टॅरिफ लागू झालं. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींसोबतच्या मैत्रीला जागले अन् आता टॅरिफ कमी करून १८ टक्क्यांवर आणला आहे. याला भारत आणि युरोपियन युनियनसोबत झालेल्या डीलची देखील मोठी पार्श्वभूमी आहे.
ज्यावेळी भारत आणि अमेरिका यांच्यात ट्रेड डीलबाबत वाटाघाटी सुरू होत्या. मात्र ज्यावेळी सर्जियो गोर यांनी अमेरिकेचे भारतातील राजदूत म्हणून कार्यभार स्विकारला तेव्हापासून ट्रेड डील फायनल करण्याला वेग आला. अनेक बाबतीत चित्र स्पष्ट होत गेलं. सर्जियो गोर यांनी पद स्विकारताच भारत आणि अमेरिका यांच्यात सर्व काही ठीक सुरू आहे असं सांगत चर्चा सकारात्मक सुरू असल्याचे संकेत दिले. लवकरच चांगले परिणाम दिसतील असं सांगितलं होतं. दोन्ही देशांमधील नातं खूप चांगलं आहे. हे देश एकमेकांचा आदर करतात असं ते म्हणाले होते.
गोर हे भारतात राजदूत म्हणून येण्यापूर्वी ते व्हाईट हाऊस प्रेसिडेंशियल पर्सनल ऑफिसचे संचालक होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ते सर्वात विश्वासू सहयोगी म्हणून ओळखले जातात. गोर यांच्यावर भारताची जबाबदारी त्यांनी दोन्ही देशांमधील तणाव वाढत असताना सोपवली होती.
राजदूत होताच त्यांनी पुढच्या दिवशाच म्हणजे १३ जानेवारी रोजीच भारत आणि अमेरिका यांच्यातील अधिकाऱ्यांमध्ये ट्रेड डीलवर चर्चा सुरू असल्याचे संकेत दिले होते. त्यांनी दोन्ही देशांमध्ये चर्चेच्या ७ फेऱ्या झाल्या आहेत. सर्व काही सकारात्मक असल्याचं देखील ते म्हणाले होते.
गोर यांनी जाहीररित्या भारतासारखा महत्वाचा सहकारी देश दुसरा कोणता नाही असं वक्तव्य केलं होतं. अमेरिका भारतासोबतच्या या डीलला या युगातील सर्वात मोठी जागतिक भागिदारी असं संबोधतो. त्यांनी दोन्ही देश व्यापारासोबतच सुरक्षा, तंत्रज्ञान, उर्जा आणि शिक्षण यासारख्या इतर क्षेत्रात देखील मजबूत भागीदारी करण्याची आवश्यकता आहे असं वक्तव्य केलं होतं.
गोर यांनी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक सच्चा मित्र मानतात आणि या वैयक्तिक विश्वासाच्या वातावरणामुळेच दोन्ही देशातील व्यापार चर्चा वेगाने पुढे सरकली.
गोर यांनी या डीलअंतर्गत भारतीय वस्तूंवर लावण्यात आलेला टॅरिफ ५० टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर आणला आहे. यामुळे दोन्ही देशातील सहकार्य सुलभ झाले णसून व्यापाराबाबतचा तणाव कमी झाली आहे.