

पुढारी ऑनलाईन डेस्क : लिबियाची राजधानी त्रिपोलीमध्ये दोन सशस्त्र गटांमध्ये झालेल्या चकमकीत 27 ठार तर 100 हून अधिक लोक जखमी झाले. 444 ब्रिगेडचा कमांडर महमूद हमजा याला त्रिपोलीच्या मिटिगा विमानतळावरून प्रवास करण्याचा प्रयत्न करताना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर सोमवारी चकमक सुरू झाली. (Libya)
दक्षिणेकडील लिबियाची राजधानी त्रिपोली येथे दोन शक्तिशाली सशस्त्र गटांमध्ये झालेल्या संघर्षात किमान 27 लोक ठार आणि 106 इतर जखमी झाले, असे देशाच्या आपत्कालीन सेवांनी मंगळवारी एका निवेदनात म्हटले आहे. (Libya)
444 ब्रिगेडचा कमांडर महमूद हमजा याला ताब्यात घेतल्यानंतर सोमवारी दोन गटामध्ये संघर्षाला सुरूवात झाली. त्याने त्रिपोलीच्या मुख्य मिटिगा विमानतळावरून प्रवास करण्याचा प्रयत्न केला. विमानतळावर नियंत्रण ठेवणाऱ्या स्पेशल डिटेरेन्स फोर्स या प्रतिस्पर्धी गटाने त्याला पकडले. त्याला ताब्यात घेण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
हेही वाचा