iran under sea internet cable threat: आधुनिक जग कशावर चालतं असं जर विचारलं तर हवा पाणी अन्न यानंतर कदाचित इंटरनेटचा नंबर लागेल. आज इंटरनेटने अख्ख जग परड्यात आल्यासारखं आहे. हे जगातलं इंटरनेटचं जाळं समुद्राच्या खोल पृष्ठभागातून सगळीकडे पसरलेलं आहे. जगातील ९५ टक्क्यांपेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय डेटा समुद्राच्या खालून ५०० पेक्षा जास्त अंडर सी केबल्सद्वारे संचालित होतो.
आता इराणच्या एका वक्तव्यामुळं या सर्व केबल्स धोक्यात आल्या आहेत. इराणचे मीडियाने होर्मुझ सामुद्रधुनीमधून जाणाऱ्या इंटरनेट केबल कंपन्यांकडून शुल्क वसूल करण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्याचबरोबर त्यांनी या केबल्स पश्चिम आशियाच्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत संवेदनशील असल्याचे सुतोवाच देखील दिले आहे.
लाल समुद्र, बाब अल-मंदेब, सुएज कावला आणि होर्मुझ या समुद्री रस्त्यावरून फक्त कच्च्या तेलाची वाहतूक होत नाही तर ते आता जगातील काही सर्वात मोठे डिजीटल चोकपॉईंट देखील झाले आहेत. युरोप, आशिया आणि अफ्रिकतील इंटरनेट आणि आर्थिक घडामोडी या भागातूनच होत असतात. गेल्या वर्षी लाल समुद्रातील केबलचे नुकसान झाल्यावर युरोप आणि आशियामधील जवळपास २५ टक्के इंटरनेट ट्रॅफिक प्रभावित झाले होते. आता इराणने हा मुद्दा समोर आणून संपूर्ण जगाला आमच्या मागण्या हलक्यात न घेण्याचा इशाराच दिला आहे.
जाणकारांच्या मते आता अंडर सी केबल्स या तेल पाईपलाईन आणि वीज ग्रीड इतकी महत्वाच्या झाल्या आहेत. अनेक केबल्स एकाच समुद्री मार्गातून जातात हा मोठा धोका आहे. यामुळं जर या भागात हल्ला, दुर्घटना किंवा तोडफोड झाली तर अनेक देशांच्या इंटरनेट सेवेवर त्याचा प्रभाव पडू शकतो. हे नुकसान फक्त मोबाईल नेटवर्क किंवा इंटनरेट, मीडियापुरतं मर्यादित राहणार नाही.
आंतरराष्ट्रीय बँकिंग, शेअर बाजार, ऑनलाईन पेमेंट, लष्करी हालचाली, ड्रोन ऑपरेशन आणि जागतिक व्यापर अत्यंत वाईट पद्धतीनं प्रभावित होऊ शकतात. विशेषकरून अफ्रिका, पश्चिम आणि दक्षिण आशियातील काही विकसनशील देशांमध्ये मोठे संकट निर्माण होऊ शकते. या देशांकडे पर्यायी नेटवर्क कमी आहेत.
रिपोर्टमध्ये समुद्राच्या खाली जर या केबलबाबत काही तोडफोड झाली तर ती कोणी केली आहे हे सिद्ध करणं अत्यंत कठिण आहे. अनेकवेळा या केबल्स दुर्घटनेत तुटल्या की कोणत्या देशाने मुद्दाम या केबलला निशान बनवलं आहे हे सिद्ध करणं अवघड जातं. त्यामुळं येणाऱ्या काळात या केबल्स लष्करी तणाव आणि जागतिक संघर्षाचे कारण ठरू शकतील.