

मडगाव : पुढारी वृत्तसेवा
कधी विदेशी पर्यटकांवर बलात्कार व खून, तर कधी सस्कारी नोकऱ्यांच्या आमिषाने नागरिकांची फसवणूक अशा विविध गुन्हेगारी घटनांमुळे चर्चेत राहिलेल्या गोव्याची आता आणखी एका गंभीर प्रकारामुळे बदनामी होत आहे.
पर्यटन, समुद्रकिनारे आणि नाईट लाईफसाठी जगभर प्रसिद्ध असलेल्या गोव्यात आता बनावट कॉल सेंटरचे जाळे वेगाने पसरत आहे. या माध्यमातून परदेशीयांची ऑनलाईन फसवणूक केली जात असल्याचे उघड होत आहे. त्यामुळे 'पर्यटनाची राजधानी' अशी ओळख असलेल्या गोव्यापुढे सायबर गुन्हेगारीचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
गोवा पोलिसांच्या सायबर क्राईम सेलने मे २०२६ पर्यंत राज्यातील अनेक बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणांच्या चौकशी दरम्यान धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. विशेषतः अमेरिकन नागरिकांना लक्ष्य करून मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केली जात असल्याचे तपासातून समोर आले आहे. गेल्या काही महिन्यांत राज्यभरातील भाड्याने घेतलेल्या आलिशान व्हिला, फ्लॅट आणि अपार्टमेंटमधून चालवण्यात येणाऱ्या २० हून अधिक बोगस कॉल सेंटरवर छापे टाकण्यात आले असून, गुजरात, महाराष्ट्र, दिल्ली, हरियाणा, नागालैंड आणि मणिपूर येथील ५० हून अधिक युवकांना अटक करण्यात आली आहे.
गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या कॉल सेंटरमधील कर्मचारी स्वतःला अमेरिकेतील कायदा अंमलबजावणी यंत्रणेचे अधिकारी, कर्ज प्रतिनिधी, 'पे-डे लोन' एजंट, अॅमेझॉन सपोर्ट कर्मचारी किंवा बैंक अधिकारी म्हणून सादर करत होते. अमेरिकन नागरिकांना फोन करून त्यांच्या नावावर गुन्हा नौद झाल्याची भीती दाखवणे, बैंक खाते गोठवण्याची धमकी देणे किंवा कर्ज मंजुरीचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक केली जात होती.
फसवणुकीसाठी आरोपर्यांकडून अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात होता. व्हीओआयपी (व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल) आणि व्हीपीएनच्या साहाय्याने कॉलचा मूळ स्रोत लपवला जात होता. तसेच पीडितांकडून अॅपल, सफोरा, टार्गेट यांसारख्या गिफ्ट कार्डद्वारे किंवा क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून पैसे उकळले जात असल्याचे तपासात उघड झाले आहे. अहवालानुसार, पोलिसांच्या गोवा राज्यातील नाईटलाईफ, विकेंड पार्टी आणि पर्यटनाच्या आकर्षणामुळे इतर राज्यांतील तरुण मोठ्या प्रमाणात गोव्याकडे आकर्षित होत आहेत.
अनेक तरुणांना उच्च पगार, आलिशान राहणीमान, मोफत निवास आणि मौजमजेचे आमिष दाखवून या बेकायदेशीर व्यवसायात ओढले जात आहे. तपास यंत्रणांच्या मते, काही कॉल सेंटर ऑपरेटर अमेरिकेत राहणाऱ्या व्यक्तींना पैसे देऊन कॉल डायव्हर्ट करण्याचे काम करत होते.
त्यानंतर हे कॉल गोव्यातील कॉल सेंटरमध्ये जोडले जात आणि तेथून अमेरिकन नागरिकांची फसवणूक केली जात होती. राज्यात वाढत्या सायबर गुन्हेगारीमुळे गोव्याच्या प्रतिमेला धक्का बसत असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या राज्यात अशा प्रकारच्या आंतरराष्ट्रीय फसवणूक रॅकेटचा उलगडा होत असल्याने कायदा-सुव्यवस्था आणि सायबर सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
गोवा पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करताना अनोळखी फोन, ई-मेल किंवा आर्थिक व्यवहारांवर विश्वास ठेवू नये, कोणालाही ओटीपी, बैंक खाते किंवा कार्डची माहिती देऊ नये, तसेच संशयास्पद प्रकार त्वरित सायबर सेलच्या निदर्शनास आणावेत, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
सायबर फसवणुकीपासून सावध राहाः देसाई
दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक संतोष देसाई यांनी 'दैनिक पुढारी'शी बोलताना नागरिकांनों सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन केले. सोशल मीडियाच्या माध्यमातून येणाऱ्या कोणत्याही संशयास्पद लिंक उघडताना विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. अनेकदा लोक केवळ कुतूहलापोटी अशा लिंकवर क्लिक करतात. मात्र त्या लिंकच्या संतोष देसाई माध्यामातून संबंधित ठकसेनाला मोबाईल किंवा वैयक्तिक माहितीचा अनावश्यक अॅक्सेस मिळू शकतो, असे देसाई यांनी सांगितले. आपला ओटीपी कोणाशीही शेअर करू नये. बैंक खाते, एटीएम कार्ड किंवा क्रेडिट कार्ड क्रमांकासारखी संवेदनशील माहिती अनोळखी व्यक्तींना देणे टाळावे. संशयास्पद कॉल, मेसेज किंवा लिंक आढळल्यास तातडीने पोलिस किंवा सायबर सेलशी संपर्क साधावा, असे आवाहनही अधीक्षक देसाई यांनी केले आहे.
गुजरातमधील सूत्रधारांचा संशय
या संपूर्ण रकेटमागे गुजरातमधील काही प्रमुख कॉल सेंटर ऑपरेटर सक्रिय असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. आर्थिक व्यवहार, क्रिप्टों ट्रान्ाँक्शन, विदेशी संपर्क आणि डिजिटल नेटवर्कचा तपास सुरू असून, या प्रकरणाचे धागेदोरे इतर राज्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता तपास यंत्रणा व्यक्त करत आहेत.