donald trump  pudhari photo
आंतरराष्ट्रीय

Donald Trump Venezuela President: डोनाल्ड ट्रम्प व्हेनेजुएलाचे 'प्रभारी राष्ट्रपती'.... सोशल मीडिया पोस्ट करून दिली माहिती?

Donald Trump Social Media Post: राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या अधिकृत ट्रुथ प्लॅटफॉर्मवरून एक विकीपिडियाचा एडिटेड फोटो टाकला आहे.

Anirudha Sankpal

Donald Trump Venezuela President: अमेरिकेचे राष्ट्राध्य डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी ते व्हेनेजुएलाचे प्रभावी राष्ट्रपती असल्याचा दावा केला आहे. अमेरिकेने काही दिवसांपूर्वीच व्हेनेजुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नी सिलिया फ्लोरेस यांना अटक करून अमेरिकेत नेलं होतं. त्यानंतर आंतरराष्ट्रीय वातावरण तंग झालं होतं.

ट्रम्प यांची सोशल मीडिया पोस्ट

व्हेनेजुएलामधील प्रभारी सरकार हे व्हेनेजुएला सुप्रीम ट्रायबुनल ऑफ जस्टीस यांच्याद्वारे घटनाच्या अधीन राहून स्थापित करण्यात आले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष दावा करत आहे तो खोटा आहे.

दरम्यान, राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या अधिकृत ट्रुथ प्लॅटफॉर्मवरून एक विकीपिडियाचा एडिटेड फोटो टाकला आहे. त्यात डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो वापरून त्याच्या खाली अॅक्टिंग प्रेसिडेंड ऑफ व्हेनेजुएला असं लिहिलं होतं.

खरंच ट्रम्प व्हेनेजुएलाचे राष्ट्रपती?

त्यावर डोनाल्ड ट्रम्प हे विनोदाने या कल्पनेनं मार्को रूबियो हे क्युबाचे राष्ट्रपती होतील. ट्रम्प यांनी पोस्ट शेअर करत त्याच्या खाली साऊंड्स गुड फॉर मी (माझ्यासाठी चांगली गोष्ट) असं कॅप्शन दिलं.

दरम्यान, व्हेनेजुएला सुप्रीम ट्रायबुनल ऑफ जस्टीस यांनी देशातील प्रशासन सुरळीत चालावं म्हणून आणि देशाच्या स्वायत्त संस्था वाचवण्यासाठी उपराष्ट्रपती डेल्के रॉड्रीग्ज यांना प्रभारी राष्ट्रपती म्हणून कार्यभार सांभळण्याचे आदेश दिले आहेत.

अमेरिकेचा देखील खुलासा

तीन जानेवारी रोजी मादुरो यांनी अटक केल्यानंतर पत्रकार परिषद घेत त्यांनी तेलाचा पुरवठा सुरळीत रहावा यासाठी व्हेनेजुएलाचा कारभार अमेरिका पाहणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर ४ जानेवारी रोजी व्हेनेजुएलाचा चर्ज अमेरिकेकडे असल्याचं जाहीर केलं होतं.

अमेरिकेने 'ऑईल क्वारंटाईन' धोरण अवलंबलं आहे. याद्वारे ते या देशाची धोरणे प्रभावित करत आहेत. दरम्यान, अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट मार्को रूबीओ यांनी रविवारी युएस व्हेनेजुएलाचे प्रशासन थेट चावलण्याचा उद्येश नसल्याचे स्पष्ट केलं.

दरम्यान, मादुरो यांनी युएसच्या कोर्टात आपल्या अटकेविरूद्ध जोरदार विरोध दर्शवला आहे. त्यांनी त्यांची अटक म्हणजे आंतरराष्ट्रीय कायद्याचं आणि संप्रभू इम्युनिटीचं उल्लंघन असल्याचं सांगितलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT