

US Planning Attack Venezuela:
जगभरातील अनेक युद्धं थांबवल्याचा दावा करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांचा देश अमेरिका आता युद्धाच्या तयारीत आहे. नुकतेच अमेरिकेनं कॅरेबियन समुद्रात आपली विमानवाहू युद्धनौका तैनात केली आहे. याचबरोबर ५ हजार सैनिक आणि ७५ लढाऊ विमानं देखील तैनात केली आहे. याबाबतची माहिती खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी दिली. त्यांनी एअक्राफ्ट कॅरिअर जेराल्ड फोर्डला लॅटिन अमेरिकेत तैनात करण्याचे आदेश दिले. हा निर्णय वेनेजुएला सोबतचा अमेरिकेचा वाढता तणावाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे.
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांचे हे पाऊल अँटी नार्कोटिक्स ऑपरेशनपेक्षा खूप मोठं मानलं जात आहे. याच्याकडं आता अमेरिकेची प्रत्यक्ष सैन्य कारवाई म्हणून पाहिलं जात आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅरेबियन क्षेत्रात अमेरिकेच्या सैन्य हालचाली वाढवण्याच्या दृष्टीनं हे पाऊल उचललं आहे. यात ८ अतिरिक्त युद्धनौका, १ न्युक्लिअर पानबुडी आणि एफ ३५ लढाऊ विमानांचा देखील समावेश आहे. जाणकारांच्या मते या निर्णयामुळं अमेरिकेच्या हेतूविषयी चिंता वाढली आहे. डोनाल्ड ट्रम्प हे दीर्घ काळापासून वेनेझुएलामधील मादुरोंच्या नेतृत्वाखालील सरकरावर ड्रग्ज तस्करी करणाऱ्यांना पाठबळ दिल्याचा आरोप करत आहेत. त्यांनी वेनेझुएलामध्ये लोकशाहीची हत्या होत असल्याचा देखील आरोप केला आहे.
दरम्यान, पेंटागॉनचे प्रवक्ते सीन पर्नेल यांनी X वर पोस्ट करून सांगितले:"यूएसएस साउथकॉम (SOUTHCOM) क्षेत्रामध्ये वाढलेल्या अमेरिकेच्या लष्करी उपस्थितीमुळे, अमेरिकेच्या सुरक्षेला आणि पश्चिम गोलार्धाच्या स्थिरतेला धोका निर्माण करणाऱ्या अवैध (Illegal) घडामोडी शोधण्याची, त्यांना रोखण्याची आणि संपवण्याची आपली क्षमता वाढेल." तसेच, त्यांनी हे स्पष्ट केले नाही की, विमानवाहू जहाज लॅटिन अमेरिकेत कधीहा पोहोचेल.
यावर ५,००० हून अधिक सैनिक आणि ७५ फायटर जेट्स तैनात आहेत.
हे २०१७ मध्ये सेवेत दाखल झालेले अमेरिकेचे सर्वात नवीन आणि जगातील सर्वात मोठे विमानवाहू जहाज आहे.
या जहाजाचा उल्लेख 'यूएस जेराल्ड फोर्ड' असा करण्यात आला आहे.
हे जहाज काही दिवसांपूर्वी युरोपमधील जिब्राल्टरच्या खाडीतून जात होते.