

Venezuela air defense system: अमेरिकेच्या स्पेशल फोर्सेसने Operation Absolute Resolve अंतर्गत व्हेनेजुएलाचे राष्ट्रपती मादुरो यांना ताब्यात घेतलं. या मोहिमेदरम्यान अमेरिकेचे हेलीकॉप्टर्स आणि विमान कोणत्याही संघर्षाशिवाय काराकसमध्ये घुसले. या मोहिमेदरम्यान व्हेनेजुएलाची एअर डिफेन्स सिस्टम पूर्णपणे फेल गेल्याचं सिद्ध झालं.
विशेष म्हणजे चीनमध्ये तयार झालेल्या JYL-1 या लांब पल्ल्याच्या 3D सर्विलांस रडार आणि JY-27A अँटी स्टेल्थ रडार कुचकामी ठरले. हे रडार्स अमेरिकेचे हेलिकॉप्टर्स डिटेक्ट करू शकले नाहीत. हे रडार्स स्टेल्थ हंटर अशी शेखी मिरवत होते. मात्र अमेरिकेच्या इलेक्ट्रॉनिक जॅमिंगमुळं हे रडार्स निकामी झाले.
व्हेनेजुएलाने चीनकडून अनके इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी ग्रुपकडून अनेक रडार खरेदी केले होते. याच JYL-1 हे लांब पल्ल्याचे ३०० ते ४७० किलोमीटर रेंजचे थ्री डी रडार JY-27/JY-27A मीटर वेव्ह बँड रडार यांचा समावेश होता. हे रडार्स F-35 सारख्या स्टेल्थ विमानांना देखील डिटेक्ट करण्यात सक्षम होते. त्यांची डिटेक्शन रेंज ही ३०० ते ५०० किमी सांगितली जाते. याच्या जोडीला रशियाचे एस ३०० आणि बल्क M2 मिसाईल सिस्टम देखील व्हेनेजुएलाच्या डिफेन्स सिस्टमचा भाग होते.
चीनच्या मीडियाने यापूर्वी ही रडार सिस्टम अमेरिकेच्या f-35 ला ७५ किमीवरून डिटेक्ट करू शकते असा दावा केला होता. मात्र अमेरिकेच्या व्हेनेजुएला हल्ल्यावेळी हा दावा फोल ठरला. अमेरिकेने ही सिस्टम EA-18G ग्राउलर सारख्या वॉरफेअर विमानानं जाम केली. त्यामुळे रडार ब्लाईंड झालं. त्यामळे अमेरिकेला सुरूवातीच्या हल्यातच एअर डिफेन्स सिस्टम नेस्तनाभूत करण्यात यश आलं.
चीनचे रडार पहिल्यांदाच अयशस्वी ठरलेली नाहीत. यापूर्वी ऑपरेशन सिंदूर दरम्यान देखील पाकिस्तानकडील चीनी बनावटीची रडार सिस्टम फेल झाली होती. भारताने ही सिस्टम सहज तोडून पाकिस्तानमध्ये आत खोलपर्यंत हल्ले केले होते. चीनने पाकिस्तानला HQ-9, LY-80 ही रडार सिस्टम दिली होती. ही सिस्टम भारतीय मिसाईल आणि ड्रोन्स डिटेक्ट करू शकली नाही. भारतानं लाहोरसह अनेक ठिकाणचे रडार उडवले होते.
अमेरिकेसारख्या देशाकडे अत्याधुनिक जॅमिंग सिस्टम आहे. ही रडार सिग्नल ब्लॉक करते. त्याचबरोबर अनेक देश रडारचा मेंटेनन्स आणि त्यासाठी लागणाऱ्या ट्रेनिंगवर चांगला भर देत नाहीत.
दुसरीकडे चीनमधील मीडिया आपल्या सैन्य उपकरणांची उगाचच हाईप क्रिएट करत असतात. ते मोठमोठे दावे करत असतात. मात्र युद्धाच्या मैदानात चीनची ही टेक्नॉलॉजी कुचकामी ठरते.
जागतिक स्तरावर घडलेल्या या घटनांमुळे चीनच्या लष्करी उपकरणांची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. व्हेनेजुएलाची सर्वात मजबूत एअर डिफेन्स सिस्टम यावेळी भंगारात निघाली. पाकिस्तानसारखं त्यांना देखील चीनच्या तंत्रज्ञानानं निराश केलं.