Donald Trump India Tariff: अमेरिकन काँग्रेसचे सदस्य ब्रॅड शर्मन यांनी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर काही धक्कादायक आरोप केले आहेत. त्यांनी या आरोपादरम्यान अमेरिका भारतावरील टॅरिफ वाढवण्याची शक्यता असल्याचा धक्कादायक दावा केला. शर्मन यांनी डोनाल्ड ट्रम्प प्रशासन रशियाकडून तेल आयात या मुद्द्यावरून भारतावर पुन्हा एकदा अर्थिक बोजा टाकण्याच्या प्रयत्नात आहे.
शर्मन यांना दावा केला की, भारत आपल्या गरजेच्या केवळ २१ टक्के तेल रशियाकडून खरेदी करतो. असं असलं तरी भारताला टार्गेट केलं जात आहे. हंगरी आणि चीन सारखे देश रशियाकडून तेल खरेदी करतात. मात्र त्यांच्यावर कोणतेही टॅरिफ लावण्यात आलेले नाही. ही परिस्थितीत भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय संबंधांवर परिणाम करून तणाव वाढू शकते.
शर्मन यांनी ट्रम्प यांच्याकडून भारतावर पुन्हा मोठा टॅरिफ लावण्याची कारणं शोधली जात आहेत. त्यांनी एक्सवर ट्विट केलं की, 'राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प भारतावर पुन्हा मोठा टॅरिफ लादण्याच्या तयारीत आहेत. ते यासाठी कारणे शोधत आहेत. ते भारत रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून असं करतोय असं सांगतात. मात्र हंगरी रशियाकडून ९० टक्के तेल खरेदी करतो. त्याच्यावर कोणताही टॅरिफ लावला जात नाही. चीन रशियाचा सर्वात मोठा तेल आयातदार देश आहे. चीनवर देखील अमेरिकेनं कोणताच दंड लावलेला नाही. अमेरिकेनं चीनवर दुसऱ्या अनेक कारणांमुळं टॅरिफ लावला आहे.'
शर्मन पुढे लिहितात, 'भारत आपल्या गरजेचं फक्त २१ टक्केच तेल रशियाकडून खरेदी करतो. अमेरिकेच्या खासदारांनी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा हा निर्णय त्वरित बदलावा असा आग्रह धरला आहे. त्यांनी जोर देऊन सांगितलं की ज्यावेळी अन्य देश रशियाकडून तेल खरेदी करतात तरी त्यांना सूट मिळते मग त्या कक्षेत भारताला का आणलं जात नाही.
त्यांनी अमेरिकेद्वारे भारताला टार्गेट केलं जात असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, 'आपल्या सहकारी देशाला टार्गेट केलं जात आहे. राष्ट्रपतींनी ही रणनिती त्वरित मागे घ्यावी.'
शर्मन यांचे हे वक्तव्य अशा वेळी आलं आहे ज्यावेळी जागतिक उर्जा क्षेत्रात रशियाचे तेल हा मुद्दा चर्चेचे केंद्रबिंदू झाला आहे. युक्रेन युद्धानंतर रशियावर अनेक प्रतिबंध लादण्यात आली आहेत. तरी देखील रशियाने आपल्या तेलाची आयात सुरूच ठेवली आहे. शर्मन यांनी हंगरी आणि चीनचे उदाहरण देऊन आपल्याच देशाच्या दुटप्पी भूमिकेवर बोट ठेवलं आहे. हंगरी युरोपीय युनियनचा सदस्य आहे. असं असलं तरी तो रशियाच्या तेलावर अवलंबून आहे. चीन हा जागतिक स्तरावरील रशियाचा एक प्रमुख व्यापारी पार्टनर आहे.
या महिन्याच्या सुरूवातीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासोबत मोठी ट्रेड डील झाल्याची घोषणा केली होती. ही घोषणा त्यांनी सोशल मीडियाद्वारे केली होती. त्यावेळी ट्रम्प यांनी भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी करारानुसार भारतावरील टॅरिफ २५ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर आणलं आहे.
ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये भारत रशियाकडून तेल खरेदी करणं बंद करणार आहे. आता तो अमेरिका किंवा व्हेनेजुएलाकडून तेल खरेदी करणार आहे असं देखील सांगितलं. त्यांनी यामुळं युक्रेनमध्ये सुरू असलेलं युद्ध संपुष्टात येईल असा देखील दावा केला होता.