

Israel Control Donald Trump: जेफ्री एपस्टीन यांच्या संदर्भातील नव्या डॉक्युमेंटमध्ये काही गंभीर आणि सनसनीखेज आरोप समोर आले आहेत. एफबीआयच्या एका रिपोर्टमध्ये एका विश्वसनीय सूत्राकडून दावा करण्यात आला आहे की अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर इस्त्रायलचा कंट्रोल होता.
रिपोर्टमध्ये असाही दावा करण्यात आला आहे की डोनाल्ड ट्रम्पचे जावई जेरेड कुशनर यांचा ट्रम्प यांच्या उद्योगात आणि राष्ट्रपती पदाच्या कामकाजात गरजेपेक्षा जास्त हस्तक्षेप होता. या कागदपत्रात कुशनरच्या कुटुंबावर कथित भ्रष्टाचार, रशियन पैशाची देवाणघेवाण आणि कट्टर यहूदी चबाड नेटवर्कशी संबंध असे आरोप होते.
अहवालात हा देखील आरोप करण्यात आला आहे की जेफरी एपस्टीनचे वकील एलन डर्शोविट्स ला मोसादने प्रभावशाली विद्यार्थ्यांना प्रभावित करण्यासाठी आपल्या गोटात सामील करून घेतले होते. रिपोर्टमध्ये कुशनरच्या कौटुंबिंक इतिहासाचा देखील उल्लेख करण्यात आला आहे. त्यांच्या वडिलांना यापूर्वी आर्थिक घोटाळ्याबाबत दोषी ठरलवलं होतं. मात्र डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्रपती झाल्यावर त्यांना माफी मिळाली होती.
अमेरिकेच्या न्याय विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या कागदपत्रात अजून एक गोष्ट समोर आली आहे. टेस्लाचे मालक एलन मस्क आणि जेफ्री एपस्टीन यांच्यामध्ये मेलवरून संपर्क झाला होता. या इमेलमध्ये एफस्टीनने मस्क यांना अमेरिकेतील व्हर्जीन आयलंडवरील आपल्या प्रायव्हेट बेटावर येण्याचे आमंत्रण दिले होते. यावेळी संभाव्य तारखा आणि प्रवासाची व्यवस्था मुलाखतीबाबत चर्चा करण्यात आली होती. मात्र मस्क कधी त्या बेटावर गेले होते का याबाबत कोणताही स्पष्ट माहिती नाहीये.
उजेडात आलेल्या माहितीनुसार प्रसिद्ध उद्योगपती बिल गेट्स यांच्यावर देखील गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. या कागदपत्रांमध्ये दावा केला गेला आहे की रशियन महिलांसोबत शारीरिक संबंध आल्यानंतर बिल गेट्स यांना लैंगिक रोग झाले होते. त्यावेळी गेट्स यांनी आपल्या पत्नीला अँटी बायोटिक्स देण्यासाठी औषधे पाहिजेत अशी गुपचूप मागणी केली होती.
हा दावा एपस्टीनकडून २०१३ मध्ये स्वत:ला केलेल्या मेलमध्ये ही गोष्ट नमुद करण्यात आली होती. अमेरिकेच्या न्याय विभागाने लाखो कागदपत्रे शुक्रवारी सार्वजनिक केली आहेत. मात्र या आरोपांची स्वतंत्ररित्या पुष्टी होऊ शकलेली नाही.