India-US Trade Tension |गोव्याची कोळंबी अमेरिकेतून 'बाद'? गेल्या वर्षभरात निर्यातीत मोठी घट; 'एमपीईडीए'चा अहवाल प्रसिद्ध

India-US Trade Tension | मागील पाच वर्षांत राज्यातून अमेरिकेला १९ हजार मेट्रिक टन कोळंबीची निर्यात
Prawn prices fall
कोळंबीpudhari photo
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

गेल्या पाच वर्षांत गोव्यातून अमेरिकेला सुमारे १९ हजार मेट्रिक टन कोळंबीची (प्रॉन्स) निर्यात झाली आहे. यातून ८८२ कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाले. मात्र, अलीकडे अमेरिकेने भारतावर आयात शुल्क वाढवल्यामुळे गेल्या वर्षभरात कोळंबी निर्यातीत कमालीची घट झाली असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने दिली आहे.

Prawn prices fall
Goa Market Issues | वास्कोतील फळ, भाजी विक्रेत्यांची सोय पार्किंगमध्ये

मंत्रालयाने संकेतस्थळावर जाहीर केलेल्या समुद्री उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाच्या (एमपीईडीए) अहवालानुसार, २०२०-२१ ते २०२४-२५ या कालावधीत गोव्यातून १९,२७९ मेट्रिक टन गोठवलेली कोळंबी अमेरिकेत निर्यात करण्यात आली.

या निर्यातीमधून सुमारे ११४ दशलक्ष डॉलर, म्हणजेच जवळपास ८८२ कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाले. सरासरी पाहता या कोळंबीला प्रति किलो ४०० ते ५०० रुपये दर मिळाला. देशभरातून याच कालावधीत ३४,८७,०३० मेट्रिक टन गोठवलेल्या कोळंबीची निर्यात झाली असून, त्यात गोव्याचा वाटा फक्त ०.५५ टक्के इतका आहे.

गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि दिल्ली या राज्यांतून अमेरिकेला कोळंबीची निर्यात होते. अमेरिकेला कोळंबी निर्यात करणाऱ्या राज्यांमध्ये गोवा दहाव्या क्रमांकावर, तर दिल्ली अकराव्या क्रमांकावर आहे. २०२१-२२ ते २०२३-२४ या कालावधीत गोव्यातून अमेरिकेला होणाऱ्या कोळंबी निर्यातीत सातत्याने वाढ नोंदवण्यात आली होती. २०२१-२२ मध्ये सुमारे ३ हजार मेट्रिक टन असलेली निर्यात २०२३-२४ मध्ये वाढून सुमारे ५ हजार मेट्रिक टनांपर्यंत पोहोचली होती. मात्र, त्यानंतर भारत आणि अमेरिकेमधील व्यापार तणाव वाढला आणि अमेरिकेने आयात शुल्क वाढवल्याचा थेट फटका गोव्याच्या कोळंबी निर्यातीला बसला

Prawn prices fall
Nashik Farmer News | थकबाकीदार 72 हजार 575 शेतकऱ्यांची माहिती अपलोड

टेरिफचा मत्स्य व्यवसायांवर परिणाम

वाढीव टॅरिफमुळे देशातील ११ पैकी ८ राज्यांमधून अमेरिकेला होणारी कोळंबी निर्यात प्रभावित झाली. विशेषतः ऑगस्ट ते डिसेंबर २०२४ आणि ऑगस्ट ते डिसेंबर २०२५ या कालावधीत गोव्यातून अमेरिकेला कोळंबीची निर्यात पूर्णपणे ठप्प झाल्याची नोंद आहे. त्यामुळे मत्स्य व्यवसायाशी संबंधित निर्यातदार, प्रक्रिया उद्योग आणि शीतगृह व्यवसायावरही परिणाम झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news