Bangladesh Crisis Young leader shot dead Bangladesh: बांगलादेशचा विद्रोही नेता शरिफ उस्मान बिन हादीची काही दिसवांपासपूर्वीच गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर बांगलादेशात हिंसाचार उसळला असून अनेक शहरात जोळपोळ अन् आंदोलन सुरू आहेत. या घटनेनंतर विशेषकरून हिंदूंना टार्गेट केलं जात आहे. त्यातच आचा अजून एका तरूण विद्रोही नेत्याला गोळ्या घातल्या आहेत.
मुहम्मद मोतलेब सिकदार असं जखमी झालेल्या युवा नेत्याचं नाव असून तो बांगलादेश नॅशनल पार्टीच्या खुलना विभागाचा प्रमुख आहे. याबाबतची माहिती डेली स्टार वृत्तसंस्थेनं दिली आहे. या गोळीबारानंतर सिकदारला खुलना मेडिकल कॉलेज रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याची परिस्थिती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे.
मुहम्मोद मोतलेब सिकदार हा बांगलादेशमधील सोनादनगा शेखपुरा पाल्ली शेखपुरा इथला रहिवासी आहे. तो ४२ वर्षाचा असून तो नॅशनल सिटीझन पार्टीचा खुलना विभागाचा प्रमुख आहे. तो NCP च्या श्रमिक शक्ती विंगचा केंद्रीय समन्वयक देखील आहे.
दरम्यान, एनसीपीचे प्रमुख समन्वयक महमुदा मिटू यांनी फेसबुक पोस्ट करून मुहम्मद मोतलेब सिकदार याला काही क्षणापूर्वी गोळ्या घालण्यात आल्याची माहिती दिली.
अनिमेश मंडल या पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 'हल्लेखोरांनी मोतलेब यांच्यावर बेछुट गोळीबार केला. सकाळी ११.४५ मिनिटांच्या सुमारास गाझी मेडिकल कॉलेज जवळ त्यांच्या डोक्यात गोळ्या घालण्याचा प्रयत्न करण्यात आला.'
दरम्यान, मंडल यांनी डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार सिकदार ऑऊट ऑफ डेंजर आहे. गोळी ही त्याच्या कानाच्या बाजूने आत घुसली अन् त्वचेतून ती आरपार जाऊन दुसऱ्या बाजूने बाहेर पडली.
बांगलादेशमध्ये शरीफ उस्मान बिल हादी याच्या हत्येनंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. तो बांगलादेशमधील २०२४ च्या आंदोलनाचा एक प्रमुख चेहरा होता. तो विद्यार्थी नेतृत्व करत असलेल्या इन्कलाब मंचाचा वरिष्ठ नेता होता. तो शेख हसिना यांचा कट्टर विरोधक अन् टीकाकार होता.
हादीला १२ डिसेंबर रोजी ढाका येथील मशिदीतून बाहेर पडताना गोळ्या घातल्या होत्या. त्यानंतर त्याला उपचारासाठी सिंगापूर इथं एअर लिफ्ट करून नेण्यात आलं होत. मात्र गेल्या गुरूवारी त्याचे निधन झाले. हादी यांच्या निधनानंतर बांगलादेशचे काळजीवाहू पंतप्रधान मोहम्मद युनूस यांनी ही देशाची न भरून येणारी हानी झाल्याचं म्हटलं. त्यानंतर त्यांनी देशभरात विशेष दुखवटा आणि प्रार्थनेचे आदेश दिले.