Manikrao Kokate: ...तोपर्यंत कारवाई करता येणार नाही; कोकाटेंना सर्वोच्च दिलासा; आमदारकी वाचली मात्र...

न्यायमूर्ती जॉयमाला बागजी यांनी शिक्षेमध्येच गंभीर तृटी असल्याचे निरीक्षण नोंदवले.
Manikrao Kokate
Manikrao Kokatepudhari photo
Published on
Updated on

Manikrao Kokate: सर्वोच्च न्यायालयात आज माणिकराव कोकाटेंना मोठा दिलासा मिळाला आहे. १९९५ सदनिका घोटाळा प्रकरणी खालच्या कोर्टाने दिलेल्या त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास नकार देणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला होता. त्याविरोधात माणिकराव कोकाटे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांना सर्वोच्च न्यायालायने मोठा दिलासा दिला आहे. न्यायमूर्ती जॉयमाला बागजी यांनी शिक्षेमध्येच गंभीर तृटी असल्याचे निरीक्षण नोंदवले.

Manikrao Kokate
Lavasa Case Verdict: लवासा प्रकरणात अजित पवार, सुप्रिया सुळे अन् शरद पवारांना हाय कोर्टाचा मोठा दिलासा

सर्वोच्च न्यायालयात झालेल्या आजच्या सुनावणीदरम्यान कोकाटे यांच्यावर सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पूर्ण होईपर्यंत कारवाई करता येणार नाही. माणिकराव कोकाटे हे आमदार म्हणून राहतील मात्र त्यांना आमदार म्हणून कोणतेही अधिकार असणार नाहीत. त्यांना कोणताही निधी वापरता येणार नाही. तसेच राज्य सभा किंवा विधानसभेत मतदान झालं तर त्यांना मतदानाचा अधिकार बजावता येणार नाही. एकप्रकारे कोकाटे विनाअधिकाराचे नामधारी आमदार असतील.

Manikrao Kokate
TRAI new rules for SMS 2025: तुम्हाला आलेला SMS खरा की खोटा.... TRAI ने सांगितलं कसं ओळखायचं?

माणिकराव कोकाटे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सरन्यायाधी सूर्य कांत आणि ज्यॉयमाला बागजी यांच्या बेंचनं माणिकराव कोकाटे यांना सध्या आमदार म्हणून अपात्र करता येणार नाही. कोकाटेंच्या शिक्षेला तुर्तास स्थगिती राहील असा निर्णय दिला.

दरम्यान, सुनावणीवेळी ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावर स्थगिती आणण्याची मागणी केली.

Manikrao Kokate
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंचा मंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडूनही मंजूर

त्यावर सर न्यायाधीश सूर्य कांत यांनी या प्रकरणी नोटीस बजावा, दरम्यान याचिकाकर्त्याच्या शिक्षेला स्थगिती राहील. त्यांच्या विधानसभेचे सदस्यत्व रद्द होणार नाही. मात्र या काळात याचिकाकर्त्याला त्याचे आमदार म्हणून कोणतेही अधिकार वापरता येणार नाहीत.

सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते माणिकराव कोकाटे यांनी दाखल केलेल्या अपीलावर सुनावणी घेतली, ज्यात त्यांनी १९९५ च्या फसवणूक प्रकरणात त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास नकार देणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले आहे.

Manikrao Kokate
Nitesh Rane : 'आता ती वेळ आली आहे!' : नितेश राणेंच्या सूचक पोस्टमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

दुसरीकडे न्यायमूर्ती जॉयमाला बागजी यांनी शिक्षेमध्येच एक गंभीर तृटी असल्याचे मत नोंदवले. माणिकराव कोकाटे यांना जरी मुंबई उच्च न्यायालयानं शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिला होती तरी त्यांनी माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर करून त्यांना काही अंशी दिलासा दिला होता.

दरम्यान, खालच्या कोर्टाने कोकाटे यांना सदनिका घोटाळा प्रकरणी शिक्षा सुनावल्यानंतर त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. दरम्यान, कोकाटे यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र नाशिक पोलीस हे मुंबईतील रूग्णालयात कोकाटेंना अटक करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पोहचले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news