Sanjay Raut  
Latest

India vs Bharat : इंडिया आघाडीच्या नावामुळे देशाच्या नावाची भिती : संजय राऊत

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : जगात अस पहिल्यांदाच अस होत आहे की, कोणीतरी राज्यकर्ता आपल्या देशाच्या नावाला घाबरत आहे. इंडिया आघाडीच्या नावामुळे पीएम मोदींना देशाच्या नावाची भिती वाटत आहे. इंडिया हे नाव हटवणं हा सरकारचा कोतेपणा आहे. पण तुम्ही काय-काय बदलणार आहात? असा सवाल करत खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. (India vs Bharat)

India vs Bharat : देशाच्या नावाचीच भिती वाटू लागली…

G20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रभती भवनातून आलेल्या अधिकृत निमंत्रण पत्रिकेवर  "प्रेसिडेंट ऑफ इंडिया" ऐवजी "प्रेसिडेंट ऑफ भारत" असा उल्लेख करण्यात आला आहे. यावरून देशातील राजकारण तापले आहे. नामांतराच्‍या मुद्यावर  विरोधी आघाडीतील अनेक पक्ष आक्रमक झाले असून, यावर संमिश्र प्रतिक्रिया विविध क्षेत्रातून व्‍यक्‍त हाेत आहेत. खासदार संजय राऊत यांनीही माध्यमांशी बोलताना केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, "इंडिया नावाच्या आघाडीमुळे मोंदींना देशाच्या नावाचीच भिती वाटू लागली आहे. इंडिया हटवणं हा सरकारचा कोतेपणा आहे."

या सरकारकडे कोणताही तोडगा नाही

मराठा आरक्षणासंदर्भात मंत्री गेले होते. यावर कोणताही तोडगा निघत नाही. यावर राऊत म्हणाले की," या सरकारकडे कोणताही तोडगा नाही आहे. केंद्र सरकारने विशेष अधिवेशनात घटनादुरुस्ती करावी. आणि मग मराठा असतील, धनगर असतील त्यांना आरक्षणात सामावून घेण्याचा प्रयत्न करावा. आम्ही त्यांच्या पाठीशी उभा राहू."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT