Latest

Christopher Nolan : नोलनचा पुढील चित्रपट अणुबॉम्बच्या जनकाविषयी

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : जगभरातील हार्डकोर चित्रपटप्रेमींसाठी ख्रिस्तोफर नोलन (Christopher Nolan) हे नाव खूप महत्त्वाचे असते. त्याने दिग्दर्शित केलेल्या 'मेमेंटो'पासून ते अलीकडच्या 'टेनेट'पर्यंत सर्वच्या सर्व चित्रपटांचे गारूड जगभरातील प्रेक्षकांवर आहे आणि आता नुकतेच नोलनच्या पुढील चित्रपटाबाबतची माहिती समोर आली आहे. (How Universal Beat Other Studios to Land Christopher Nolan's New World War II Epic)

नोलनचा (Christopher Nolan) हा आगामी चित्रपट दुसर्‍या जागतिक महायुद्धाच्या पार्श्वभूमीवरील असणार आहे. दुसर्‍या महायुद्ध काळात विकसित करण्यात आलेल्या अणुबॉम्बचे जनक जे. रॉबर्ट ओपेनहायमर होते. त्यांच्याविषयी हा चित्रपट असणार आहे.

ओपेनहायमर हे अमेरिकेत फिजिक्सचे प्राध्यापक होते. अणुबॉम्बची पहिली चाचणी ज्यांच्या निरीक्षणात झाली त्या टीममध्येही ते होते. त्यांच्या टीमने बनवलेले अणुबॉम्ब अमेरिकेने नंतर हिरोशिमा आणि नागासाकी येथे टाकले होते.

एरव्ही नोलन त्याचा प्रत्येक चित्रपट वॉर्नर ब्रदर्स स्टुडिओसोबत बनवतो; पण वॉर्नर ब्रदर्सने त्यांचे चित्रपट थिएटर्स आणि ओटीटीवर एकाचवेळी प्रदर्शित करण्याचे ठरवले.

नोलन नेहमीच थिएटर्समध्ये चित्रपट प्रदर्शनाचा आग्रह धरत आला आहे.

त्यामुळेच त्याला ही बाब आवडली नाही. त्यामुळे नोलनचा हा आगामी चित्रपट वॉर्नर ब्रदर्स नव्हे, तर युनिव्हर्सल स्टुडिओद्वारे बनवला जात आहे.

सीजीआय ग्राफिक्सपेक्षाही खरेखुरे शॉटस् घेण्याला प्राधान्य

दरम्यान, नोलन त्याच्या सीजीआय ग्राफिक्सपेक्षाही खरेखुरे शॉटस् घेण्याला प्राधान्य देतो. त्याच्या 'डंकर्क'मधील द़ृश्यांसाठी विमानांवर कॅमेरे लावले गेले होते. गेल्या वर्षी आलेल्या 'टेनेट'मधील एका द़ृश्यासाठी नोलनने खर्‍याखुर्‍या विमानाचा अपघात घडवून आणला होता.

आता आगामी चित्रपट अणुबॉम्बविषयी असल्याने त्यावरून नोलन खरेच अणुबॉम्बचा विस्फोट घडवून आणणार नाही ना, अशा आशयाचे विनोदी मिम्सही सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. या मिम्समुळे नोलनचा आगामी चित्रपट युवा विश्वात चर्चेचा विषय ठरला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT