Latest

Piyush Jain IT Raid: २३२ कोटींची रोकड, ६४ किलो सोने, २५० किलो चांदी आणि ६०० किलो चंदन तेल जप्‍त

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क
अत्तर व्यापारी पीयूष जैन याच्‍याकडे सापडलेल्‍या अब्‍जावधी रुपयांच्‍या संपतीने  अधिकारीही चक्रावले ( Piyush Jain IT Raid) आहेत. त्‍याच्‍या कानपूर आणि कन्‍नौज येथील घर आणि गाेडावूनमधून सुमारे २३२ कोटी रुपयांची रोकडसह तब्‍बल ६४ किलो सोने, २५० किलो चांदी आणि ६०० किलाे चंदन तेल जप्‍त करण्‍यात आले आहे. दरम्‍यान, त्‍याच्‍या घरात मिळालेल्‍या सोन्‍याची बिस्‍किट ही दुबई आणि ऑस्‍ट्रेलियातून आणण्‍याची माहिती प्राथमिक तपासात समाेर आली आहे. त्‍याने विदेशातून आणलेल्‍या सोन्‍याची महसूल गुप्‍तचर संचालनालय विभागाकडून ( डीआरआय ) चौकशी करण्‍यात येणार आहे.

'डीआरआय'च्‍या अधिकार्‍यांनी पीयूष जैन याच्‍या उत्तर प्रदेशमधील कानपूर आणि कन्‍नौज येथील घरांसह गोडावन आणि अत्तर निर्मिती कारखान्‍यांवर गेली पाच दिवस तपासणी सुरु हाेती. त्‍याच्‍या  कानपूरमधील घरातून १७७.४५ कोटी रुपये तर कन्‍नौज येथील घरातून १९ कोटींची रोकड, ६४ किलोंच्‍या सोन्‍याच्‍या विटा, २५० किलोंची चांदी आणि ६०० किलो चंदन तेल जप्‍त केले आहे. त्‍याच्‍या दोन्‍ही घरातून सुमारे २३२.४५ कोटी रुपये जप्‍त करण्‍यात आले आहेत. मंगळवारी पोलिस दलाला घेवून 'डीआरआय'ने कारवाई केली. यावेळी पाच बॉक्‍स भरुन रोकड जप्‍त करण्‍यात आले, अशी माहिती जीएसटी गुप्‍तचर संचालनालयाच्‍या (डीजीजीआय) सूत्रांनी दिली.

Piyush Jain IT Raid : पीयूषचे सोने तस्‍कर करणार्‍या टोळीशी संबंध ?

पीयूष जैनकडे तब्‍बल ६४ किलोच्‍या सोनाच्‍या विटा व बिस्‍किट सापडले. आता हे सोने त्‍याने कोणत्‍या देशातून आणले? त्‍याचे सोने तस्‍करी करणार्‍या आंतरराष्‍ट्रीय टोळीबरोबर त्‍याचे संबंध आहेत का? याचा तपास 'डीआरआय' करणार आहे. पीयूष जैन याच्‍या घरात सापडलेल्‍या सोने अबूधाबी येथील प्रीशस मेटल रिफाइनर्सचा शिक्‍का आहे. या कंपनीची शाखा शारजाह येथील आहे. तर दुसरी शाखा ही दुबई येथे आहेत. सोने तस्‍कर करणार्‍या आंतरराष्‍ट्रीय टोळीबरोबर त्‍याचे संबंध असल्‍याचे उघड झाले तर या गुन्‍ह्यांसाठी कडक शिक्षेच्‍या तरतुदी आहे.

कारवाईसंदर्भात माहिती देताना जीएसटी गुप्‍तचर संचालनालय (डीजीजीआय) अतिरिक्‍त संचालक जाकिर हुसैन यांनी माध्‍यमांशी बोलताना सांगितले की, अत्तर व्‍यापारी पीयूष जैन याच्‍या मालमत्तेची मागील पाच दिवसांपासून तपासणी सुरु होती. याच्‍या आर्थिक व्‍यवहाराची आम्‍ही तपासणी केली. आम्‍ही केलेल्‍या कारवाईत सापडलेले सोने हे महसूल गुप्‍तचर संचालनालय विभागाकडे
( डीआरआय ) दिले आहे. पीयूष जैन याच्‍या कन्‍नौज येथील घरात सापडलेले १९ कोटींची रोकड ही येथील स्‍टेट बँक ऑफ इंडियाच्‍या शाखेत जमा करण्‍यात आली आहे.

हेही वाचलं का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT