Latest

Honda Elevate SUV Car : होंडाची नवी कार; भारतात लवकर होणार लॉन्च, बुकिंग सुरु

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : होंडा या जपानी ऑटोमोबाईल कंपनीच्या कार भारतात खूप प्रसिद्ध आहेत. सध्या त्यांची काही मोजकीच मॉडेल्स बाजारात आहेत. होंडाचे चाहते कंपनीच्या नव्या कारच्या प्रतिक्षेत होते. मात्र आता चाहत्यांची प्रतिक्षा संपणार आहे. कंपनी लवकरच नवीन एसयुव्ही कार (SUV Car) लॉन्च करणार आहे. त्यांची ही नवी एसयुव्ही कार होंडाच्या कार चाहत्यांना मोठी खुशखबर आहे. (Honda Elevate SUV Car)

होंडाच्या भारतातील आगामी कारचे नाव आहे 'एलेव्हेट' (Honda Elevate). ही कार एसयुव्ही (SUV Car) प्रकारातील आहे. कार चाहत्यांना खूप दिवसांनंतर होंडाची नवी एसयुव्ही कार (Honda New Car) पहायला मिळणार आहे. नवनवीन फिचर्स आणि आकर्षक असे डिझाईन कारचे असेल अशी चर्चा ट्विटरवर आहे. होंडाने एलेव्हेटचे बुकिंग सुरु केले आहे. एसयूव्हीसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने बुकिंग सुरु आहे. बुकिंग केल्यानंतर ग्राहकाला टोकन मिळेल. त्यानंतर कार लॉन्च झाल्यानंतर ग्राहकाला नवी कार उपलब्ध होईल.

होंडाने जूनमध्ये ही एलेव्हेट कारबाबतची माहिती दिली होती. विशेष म्हणजे कंपनीने ही मध्यम आकाराची कार प्रथम भारतात लॉन्च करणार असल्याचे सांगितले आहे.

'एलेव्हेट' कारची फिचर

Honda Elevate मध्ये 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, सात-इंचाचा HD कलर TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळतो. इन्फोटेनमेंट सिस्टिमला वायरलेस स्मार्टफोन इंटिग्रेशन तंत्रज्ञान जोडलेले आहे. तसेच या SUV ला Honda Connect देखील मिळते, जे अनेक कनेक्ट केलेल्या फिचर्स सह सुसज्ज आहे. यामध्ये जिओ-फेन्सिंग, आपत्कालीन मदत अशी अनेक फिचर उपलब्ध असणार आहेत.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT