Nauvari Song : ‘मला नऊवारी साडी पाहिजे’ गाण्याने धुमाकूळ, २० मिलियन हिट (Video) | पुढारी

Nauvari Song : 'मला नऊवारी साडी पाहिजे' गाण्याने धुमाकूळ, २० मिलियन हिट (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्रातील धानवड तांडा येथील तरुण त्याच्या बाप्पाच्या भक्ती पोटी आणि बाप्पाच्या गाण्याने केलेल्या करिअरच्या सुरुवातीने तो संपूर्ण भारतभर पोहोचला आहे. असा हा गायक, संगीतकार, गीतकार म्हणजे संजू राठोड. (Nauvari Song ) संगीत क्षेत्रात येण्याआधी कोणताही वारसा नसताना संजूने स्वमेहनतीच्या जोरावर स्वतःची ओळख तयार केली. संजूच्या लोकप्रिय झालेल्या गाण्यांना संजूच्या स्वप्नांना सत्यात उतरवलं. सध्या सोशल मीडियावर ‘नऊवारी’ या गाण्याने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या गाण्याचा गायक, संगीतकार दुसरं तिसरं कोणी नसून संजू राठोड आहे. काही दिवसांतच या गाण्याने मिलिअन प्रेक्षकांची मने जिंकली. (Nauvari Song )

‘नऊवारी’ अगोदर ‘डिंपल’, ‘देव बाप्पा – बाप्पावाला गाणा’, ‘स्टाईल मारतंय’ या गाण्यांना देखील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं. मिलियन व्यूजचा टप्पा पार करणं हे काही संजूसाठी सोप्प नव्हत. सुरुवातीच्या काळात संजूनेही बराच स्ट्रगल केला. गाणी बनवण्यात मधल्या काही काळात खंड ही पडला मात्र बाप्पाच्या कृपेने, गणेशोत्सवात पुन्हा एकदा ‘देव बाप्पा – बाप्पावाला गाणा’ हिट झालं. २० वर्षीय, संजूचा भाऊ गौरव राठोड (जी स्पार्क) याच्या सोबतीने दोघांनी एकापेक्षा एक मराठी गाणी तयार केली. शिवाय संजू आणि गौरव राठोड सोबत प्राजक्ता घाग, मनिष महाजन आणि ‘नऊवारी’ गाण्याच्या संपूर्ण टीमच्या मेहनतीने तयार झालेल्या या गाण्याने २० मिलियनचा टप्पा पार केला आहे तर स्पॉटिफाय या ऑडियो प्लॅटफॉर्मवर १ मिलियन स्ट्रीम्स मिळाले आणि इन्स्टाग्रामवर ४००K पेक्षा जास्त लोकांनी रिल्स बनवल्यामुळे हे गाणं सध्या ट्रेंडिंगवर आहे.

गाणी तयार करणं हे संजूचं पॅशन आहे. संजूच्या या पॅशनला, ‘बिलिव्ह आर्टिस्ट सर्व्हिसेस’ कंपनीची साथ मिळाली आणि त्याचा पुढील प्रवास त्याच्या मनाप्रमाणे सुरु झाला. संजूच्या ‘नऊवारी’ गाण्याने तर खरंच कमाल केली. प्रेक्षकांची मागणी पाहता लवकरच या गाण्याचं फिमेल व्हर्जन देखील येणार आहे. तसेच प्रेक्षकांच्या प्रेमापोटी ‘बुलेटवाली’ हे संजूचं नवीन गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अर्थात ‘बुलेटवाली’ हे गाणं देखील मिलिअन व्ह्युजचा प्रवास करणार एवढं मात्र नक्की.

Back to top button