Maharashtra Politics  
Latest

ED raids NCP leader Hasan Mushrif : हसन मुश्रीफ लढवय्ये नेते; दहशतीचे राजकारण जास्त काळ टिकत नाही : संजय राऊत

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : विरोधी पक्षातील नेत्यांविरोधात दबावाचे राजकारण केले जात आहे. जे लढत आहेत, जे एका विचार धारेविरुद्ध आहेत, त्यांच्याविरोधात केंद्रीय तपास यंत्राणांकडून धाडी पडत आहेत. हसन मुश्रीफ लढवय्ये, संघर्ष करणारे आणि संकटाशी सामना करणारे नेते आहेत. ते या संकटातून बाहेर पडतील, आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, असे ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

हसन मुत्रीफ यांच्या कागल आणि पुणे येथील घरावर आज ईडीचे छापे पडले आहेत. याबाबत बोलताना खासदार राऊत म्हाणाले की, मुश्रीफांना तुरूंगात टाकण्याची भाषा काही लोकांनी याआधी केली होती. सरकारमध्ये सामील झालेल्या लोकांना दिलासा मिळतो आणि जे विरोधी पक्षात आहेत त्यांच्याविरोधात दबावाचे राजकारण केले जाते. मुश्रीफ लढवय्ये, संघर्ष करणारे, संकटाशी सामना करणारे नेते असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीचे छापे

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल (कोल्हापूर) येथील घरांवर ईडीने छापे टाकले आहेत. कागल शहरातील माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या बंगल्यावर तसेच सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना आणि शहरातील माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांच्या बंगल्यावर एकाच वेळी सकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली. त्यांच्या घरांच्या परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. (ED raids NCP leader Hasan Mushrif)

हसन मुश्रीफ आणि प्रकाश गाडेकर यांच्या निवासस्थानी दिल्ली पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या छाप्याची माहिती स्थानिक पोलिसांना नसल्याचे समजते. मुश्रिफांच्या घरावर छापा पडला असल्याचे समजताच मुश्रीफ गटाच्या कार्यकर्त्यांनी निवासस्थानासमोर तसेच गैबी चौकात गर्दी केली.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT