shahrukh khan Delhi home  
Latest

HBD Shahrukh Khan : शाहरुखचा दिल्लीतील बंगला पाहिला का? (Photos)

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : शाहरुख खान मुंबईतचं नव्हे तर दिल्लीतही घर आहे. शाहरुखची पत्नी गौरी खानने (HBD Shahrukh Khan) आपल्या हाताने हे घर पुन्हा सजवले आहे. मध्यंतरी शाहरुखने घराचे काही फोटो शेअर करत एक कॅप्शन लिहिली होती की… दिल्लीतील आपल्या सुरुवातीच्या दिवसांच्या अनेक आठवणींसह. या शहराचे आमच्या हृदयात एक विशेष स्थान आहे. @गौरीखान यांनी आमच्या दिल्लीतील घराची पुनर्रचना केली आहे आणि ते प्रेम आणि नॉस्टॅल्जियाच्या क्षणांनी भरले आहे. आज शाहरुखचा वाढदिवस आहे. या औचित्याने त्याच्या सर्वात जुन्या आणि आठवणींनी भरलेल्या दिल्लीतील बंगल्याविषयी जाणून घेऊया. (HBD Shahrukh Khan)

अभिनेता शाहरुख खान चित्रपटांशिवाय आपल्या खासगी जीवनामुळे चर्चेत असतो. दिल्लीचा राहणारा शाहरुख खानने हिंदी इंडस्ट्रीमध्ये आपले करिअर करण्यासाठी खूप मेहनत घेतली. त्य़ाच्या संघर्षाची कहाणी सर्वश्रुत आहेच. शाहरुखच्या आणखी एका गोष्टीची चर्चा होते, तो म्हणजे त्याचा मन्नत बंगला. मुंबईतील हा मन्नत बंगला एखाद्या महलपेक्षा कमी नाही. पण, तुम्हाला त्याच्या दिल्लीतील घराविषयी माहितीये का? तुम्ही दिल्लीतील घराचे फोटो पाहिले आहेत काय? शाहरुख खानची पत्नी गौरी खानने आपल्या दिल्लीतील बंगलाचे रिन्युएशन स्वत: केले आहे.

गौरी आणि शाहरुख खानने एकदा दिल्लीतील घराचे फोटो शेअर करताना हे घर आठवणींनी भरले आहे, असे म्हटले होते. आणखी एका फोटोंच्या कॅप्शनमध्ये गौरी खानने लिहिले होते. आमचा छोटा प्रवास याच घरापासून सुरुवात झाला. आमचं हे दिल्लीतील घर अनेक आठवणींनी भरलं आहे. टेक्स्चर, फॅब्रिक्स आणि रग्जने घर सजलेलं आहे. हे डेकोरेशन आमच्या आठवणींना आणखी ताजं बनवतं.

गौरी खानने या बंगल्याला पुन्हा डिझाईन केलं आहे. तसेच शाहरुख खाननेही या बंगल्याचे काही फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले होते. यासोबतचं शाहरुख खानने खास पोस्टमध्ये लिहिलं होतं-'दिल्लीमध्ये आमच्या सुरुवातीच्या दिवसांच्या खूप साऱ्या आठवणी. हे शहर आमच्या मनात खास आहे. गौरीने हे घर पुन्हा डिझाईन केलं आहे. हे घर जुन्या आठवणी आणि प्रेमाने भरलेले आहे.'
गौरी खाननेदेखील दिल्लीतील बंगल्याशी संबधित एक व्हिडिओदेखील सोशल मीडियावर शेअर केला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT