तळेगाव-चाकण महामार्गावर भक्कम गतिरोधक बसवावेत | पुढारी

तळेगाव-चाकण महामार्गावर भक्कम गतिरोधक बसवावेत

तळेगाव स्टेशन : पुढारी वृत्तसेवा : तळेगांव- चाकण महामार्गावर मनोहर नगर जवळ सार्वजनिक बांधकाम खात्याने फायबरचे गतिरोधक गेल्या अॉक्टोंबर मध्ये बसविले आहेत नाशिक अहमदनगर आदी भागातून मुंबईकडे आणि इतरत्र जाणारी आणि येणारी अवजड वाहतूक या महामार्गावर मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे लगेच हे गतिरोधक उखडले आहेत.

त्याचे बोल्ट वर आले असून लहान व मोठया वाहनांचे टायर फुटून दुर्घटना होऊन जिवीत हानी होण्याची शक्यता आहे तसेच नेहमीच्या वाहतूक कोंडीत आणखी भर पडण्याची शक्यता आहे. सदर गतीरोधक बसविल्यानंतर थोड्या दिवसातच उखडले असुन काही दिवसात ते गतीरोधक निकामी होण्याची शक्यता असुन ते बसविण्याचा उद्देश सफल होणार नाही.अशा ठिकाणी डांबरीकरणाचे भक्कम गतिरोधक असावेत अशी वाहन चालकांकडून आणि स्थानिक नागरिकांकडून मागणी होत आहे.

Back to top button