mamoothy 
Latest

HBD Mammootty : ‘या’ सुपरस्टारकडे आहेत ३६९ आलिशान गाड्या, रॉयल लाईफ

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : आपण पाहतो की सेलिब्रिटींकडे लक्झरी कारचे कलेक्शन असते. काही स्टार्सना कारचे कलेक्शन करण्याची आवड असते. बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत ज्यांना महागड्या बाईक, फोन, शूज आणि कपड्यांचे शौकीन आहे. पण आज आम्ही तुम्हाला एका अशा स्टारबद्दल सांगणार आहोत, ज्याला महागड्या कार कलेक्शन करण्याचा छंद आहे. त्या स्टारकडे असणारे कार कलेक्शन पाहून तुम्हीही चक्रावून जाल. त्या अभिनेत्याचे नाव आहे मामूट्टी. हे दाक्षिणात्य प्रसिध्द अभिनेते असून त्यांचा आज ७ सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. (HBD Mammootty) यानिमित्त जाणून घेऊया त्यांच्याविषयी आणि त्यांच्याकडे असणाऱ्या कार कलेक्शनविषयी.

दक्षिण भारतीय सुपरस्टार मामूट्टी यांनी मल्याळम आणि तमिळ चित्रपटांमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. मामूट्टी यांना कारची प्रचंड आवड आहे. त्यांच्याकडे ५-१० नव्हे तर तब्बल ३६९ कार आहेत. त्यामध्ये स्वस्तात स्वस्त ते महागड्या गाड्यांचा समावेश आहे. (HBD Mammootty)

एवढेच नाही तर मामूट्टी यांनी काही वर्षांपूर्वी देशातील पहिली मारुती-८०० खरेदी करण्याची इच्छाही व्यक्त केली होती. मामूट्टी यांनी त्यांच्या कारसाठी स्वतंत्र गॅरेज बांधले आहे. मामूटी बहुतेक स्वतः कार चालवण्यास प्राधान्य देतात.

Jaguar XJ-L (Caviar) हे मेगास्टार मामूट्टीच्या कलेक्शनमध्ये नवीन पडलेली भर आहे. त्याच्या दोन्ही व्हर्जन (पेट्रोल-डिझेल) मामूट्टी यांनी विकत घेतल्या आहेत. इतकेच नाही तर त्याचा नोंदणी क्रमांक (KL 7BT 369) देखील त्यांच्याकडील एकूण ३६९ कार कलेक्शन संग्रहावर आधारित आहे. तथापि, त्यांच्या बहुतेक गाड्यांचे क्रमांक ३६९ आहेत.

याशिवाय मामूट्टी यांच्या कलेक्शनमध्ये टोयोटा लँड क्रूझर एलसी २००, फेरारीचे अनेक मॉडेल्स, मर्सिडीज आणि ऑडी, पोर्श, टोयोटा फॉर्च्युनर, मिनी कूपर एस, एफ१० बीएमडब्ल्यू ५३०डी आणि ५२५डी, ई४६ बीएमडब्ल्यू एम३, मित्सुबिशी पाजेरो पजेरो पी२, एक्स्वॉस स्पोर्ट्स आणि अनेक मॉडेल्सचा समावेश आहे. अधिक एसयूव्ही. मामूटीकडे आयशरचा एक कॅरावॅनदेखील आहे.

दक्षिणेतील ऑडी खरेदी करणारा मामूट्टी हा पहिला स्टार असल्याचेही म्हटले जाते. मामूट्टीला देशातील कार म्हणजेच मारुतीवर खूप प्रेम आहे. त्यांनी मारुतीकडून पहिली कारही घेतली होती आणि त्यांच्या ३६९ गाड्यांपैकी अजूनही मारुतीच्या तीन मॉडेल्स आहेत.

जाणून घ्या मामूट्टीविषयी

मामूट्टी यांचे आधीचे नाव मोहम्मद कुट्टी असे होते. त्यांचा जन्म ७ सप्टेंबर, १९५१ मध्ये झाला. मल्याळम चित्रपटातील प्रसिद्ध चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. आपल्या करिअरमध्ये त्यांनी ३०० हून अधिक चित्रपटांत काम केले आहे.

तीन राष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी

मामूट्टी यांना आपल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी तीन राष्ट्रीय पुरस्कार, चार राज्य पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा आठ वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. १९९८ मध्ये, भारतीय चित्रपटातील उत्कृष्ट योगदानासाठी पद्मश्रीने सन्मानित केलं आहे.

हिंदी चित्रपटातील योगदान

मामूट्टी यांनी हिंदी १९८९ मध्ये हिंदी चित्रपटात काम केले होते. मुख्य अभिनेता म्हणून त्यांचा पहिला बॉलीवूड चित्रपट 'धरतीपुत्र' फार चालला नाही. राष्ट्रीय स्तरावर जब्बार पटेलद्वारा दिग्दर्शित बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT