

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : तुम्ही माझ्या केसांना व्यवस्थित कलर (डाय) केले नाही, माझे केस काळे होण्याऐवजी पांढरेच दिसत आहेत, असा आरोप करत एका महिलेने सलून चालकाला चक्क चपलेने मारहाण केल्याची घटना सोलापुरात घडली. या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.
या विषयी अधिक माहिती अशी की, सोलापुरातल्या सात रस्ता परिसरात डायमंड हेअर सलून आणि ब्युटी पार्लर आहे. या सलूनमध्ये एक महिला डाय करण्यासाठी आली होती. यावेळी डाय झाल्यानंतर संबंधित महिलेने माझे केस काळे होण्याऐवजी पांढरेच दिसत आहेत, म्हणत सलून चालकाला मारहाण केली. यावेळी या महिलेने सलूनमधील साहित्याचीही तोडफोड केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. मोहम्मद साजिद सलमाने (वय 22) यांनी बाजार पोलीस ठाण्यात या विषयी तक्रार दिली आहे. सदरबाजार पोलिसांनी या घटनेचा गुन्हा नोंद केला आहे.
हेही वाचा :