Latest

Gold Silver Rate : सोने आताच खरेदी करून घ्या ऐन दिवाळीच्या तोंडावर सोन्याला झळाळी येणार

backup backup

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर शुक्रवारी शेअर बाजार बंद होताना सोने आणि चांदीच्या दरांमध्ये घसरण झाल्याचे दिसले. सोन्याच्या दरात तब्बल १०४ रुपयांनी घसरून ४७८३६ रुपये प्रती दहा ग्रॅम झाले. तर चांदीचा दर २६३ रुपयांनी घसरत ६४६९५ वर थांबला. (Gold Silver Rate)

शेअर बाजार बंद होताना MCX वर सोने आणि चांदीचे दर मोठे होते. दरम्यान सनासुदीच्या काळात सोन्या चांदीच्या दरात घसरण होत असल्याने ग्राहकांनी चांगलीच पसंती दिली आहे. (gold silver rate mcx gold spot price international gold price)

Gold Silver Rate : धनत्रयोदशीच्या तोंडावर सोने खरेदी करण्याची मोठी संधी

धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर ग्राहक मोठ्या प्रमाणात सोने आणि चांदी खरेदीसाठी बाहेर पडत असतात.

दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या किमतीत घट होणार असल्याने सोन्या चांदीच्या दरात वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे.

नवी दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा दर ४७०९० रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीचा दर ६४६०० रुपये प्रति किलो आहे. चेन्नईमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ४५,२४० रुपये आणि चांदीचा दर ६९२०० रुपये प्रति किलो आहे.

मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा दर ४७०९० रुपये आणि चांदीचा दर ६४६०० रुपये किलो आहे. कोलकातामध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,३४० रुपये आणि चांदीचा दर ६४६०० रुपये प्रति किलो आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT