RSA vs SL : हसरंगाची हॅट्ट्रिक कमाल, मात्र किलर मिलरची अखेरच्या षटकात धमाल | पुढारी

RSA vs SL : हसरंगाची हॅट्ट्रिक कमाल, मात्र किलर मिलरची अखेरच्या षटकात धमाल

शारजाह : पुढारी ऑनलाईन

RSA vs SL : श्रीलंकेच्या १४३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची देखील वाताहत झाली. लंकेचा फिरकीपटू वानिंदू हसरंगाने हॅट्ट्रिक साधत आफ्रिकेची अवस्था ६ बाद ११२ अशी केली. मात्र डेव्हिड मिलरने अखेरच्या षटकात दोन षटकार आणि एक चौकार मारत ही हॅट्ट्रिक निष्प्रभ केली. दक्षिण आफ्रिकेने शेवटच्या षटात १५ धावा ठोकून १४३ धावांचे आव्हान ४ गडी आणि १ चेेंडू राखून पार केले.

दक्षिण आफ्रिकेला १४३ चेस करताना पहिले धक्के दिले ते वेगवान गोलंदाज दशमुंथा चमीराने. त्याने पहिल्यांदा रिझा हेंड्रिक्स ( ११ ) आणि क्विंटन डिकॉक ( १२ ) या सलामी जोडीला माघारी धाडले. त्यानंतर डुसेन आणि कर्णधार टेम्बा बाऊमाने भागीदारी करण्याचा प्रयत्न केला. मात्र डुसेन १६ धावांवर धाबदाद झाला. तो बाद झाला त्यावेळी आफ्रिका ८ षटकात ४९ धावांपर्यंत पोहचवले होते.

कर्णधार बाऊमाने मार्करमच्या साथीने संघाला १५ षटकात ९६ धावांपर्यंत पोहचवले. त्यानंतर मात्र हसरंगाने आपल्या फिरकीची जादू बिखेरली. त्याने १५ व्या षटकाच्या अखेरच्या षटकात मार्करमला बाद केले. त्यानंतर सतऱ्याव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर कर्णधार टेम्बा बाऊमाला बाद केले. पुढच्याच चेंडूवर ड्वेन प्रेटोरियसने राजपक्षेच्या हातात चेंडू मारत हसरंगाची हॅट्ट्रिक होण्यास हातभार लावला.

मात्र या पडझडीनंतर आफ्रिकेची धावगती मंदावली. दरम्यान, डेव्हिड मिलर आणि कसिगो रबाडाने अखेरपर्यंत झुंज दिली. अखेरच्या षटकात १५ धावांची गरज असताना डेव्हिड मिलरने दोन षटकार आणि एक चौकार मारत सामना जिंकून दिला. त्याने १३ चेंडूत २३ धावा केल्या तर कसिगो रबाडाने ७ चेंडूत १३ धावा केल्या.

तत्पूर्वी, टी २० वर्ल्डकपमध्ये आजच्या दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेच्या ( RSA vs SL ) सामन्यात आफ्रिकेचा चायनामन फिरकी गोलंदाज तबरेज शामसी समोर लंकेच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने २० धावांवर श्रीलंकेला पहिला धक्का दिला. नॉर्खियाने कुसल परेराला ७ धावांवर बाद केले.

त्यानंतर आलेल्या चिरथ असलंका आणि सलामीवीर पथम निसंकाने भागीदारी रचण्यास सुरुवात केली. या दोघांनी ९ व्या षटकात संघाची साठी पार केली. मात्र असलंका २१ धावांवर धावबाद झाला आणि ही जोडी फुटली. दरम्यान, चायनामन फिरकी गोलंदाज तबरेज शामसी गोलंदाजीला आला आणि त्याने लंकेच्या फलंदाजांची पळता भुई थोडी केली.

RSA vs SL : चायनामन फिरकीत अडकली लंका

पहिल्यांदा त्याने भनुका राजपक्षेला शुन्यावर बाद केले. त्यानंतर शामसीने आपल्या पुढच्या षटकात अविष्का फर्नांडोला ३ धावांवर बाद करत लंकेचा चौथा फलंदाज माघारी धाडला. त्यानंतर शामसीने १४ व्या षटकात वनिंदु हसरंगाला ४ धावांवर बाद करत लंकेची अवस्था ५ बाद ९१ अशी केली.

ही सगळी पडझड दुसऱ्या बाजूने पाहत असलल्या पथम निसंंकाने डावाची सूत्रे आपल्या हातात घेत आपले अर्धशतक पूर्ण केले. याचबरोबर संघालाही शंभरी पार करुन दिली. दरम्यान, दसून शनकाने त्याला ११ धावांची साथ दिली. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांनी लंकेची शेपूट गुंडळण्यास सुरुवात केली. प्रिटोरियसने शनका ( ११ )  आणि करुणारत्नाला ( ५ ) बाद केले. दुसरीकडे निंसकाने आक्रमक फलंदाजी करत संघाची धावसंख्या वाढवण्यास सुरुवात केली.

मात्र संघाला १३१ धावांपर्यंत पोहचवल्यानंतर तोही ७२ धावांवर बाद झाला. त्यालाही प्रिटोरियसनेच बाद केले. नॉर्खियाने दुश्मंथा चमिराला ३ धावांवर बाद करत लंकेची शेपुट गंडाण्यास सुरुवात केली. अखेर डावाच्या शेवटच्या चेंडूवर कुमारा धावबाद झाला आणि लंकेचा डाव १४२ धावांवर संपुष्टात आला.

Back to top button