quinton de kock racism : अखेर क्विंटन डिकॉकने वर्णद्वेशाविरोधात गुडघे टेकले | पुढारी

quinton de kock racism : अखेर क्विंटन डिकॉकने वर्णद्वेशाविरोधात गुडघे टेकले

शारजाह : पुढारी ऑनलाईन

quinton de kock racism :  दक्षिण आफ्रिकेचा विकेटकिपर क्विंटन डिकॉक अखेर दक्षिण आफ्रिकेकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला. टी २० वर्ल्डकपमध्ये वेस्ट इंडीज विरुद्धच्या सामन्यात कर्णधार क्विंटन डिकॉकने स्वतःला संघातून वगळले होते. त्याचा आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा वर्णभेद विरोध करण्याच्या पद्धतीवरून वाद झाला होता. तो गुडघे टेकून वर्णभेदाचा विरोध करण्यास तयार नव्हता. या विषयावर गोंधळ निर्माण झाल्यानंतर क्विंटन डिकॉकने माफी मागितली होती.

या माफीनाम्यानंतर आज ( दि. ३० ) दक्षिण आफ्रिका श्रीलंकेविरुद्ध खेळण्यासाठी मैदानात उतरली. त्यावेळी क्विंटन डिकॉक देखील अंतिम अकरात होता. त्याला क्लासेनच्या जागी संघात स्थान दिले होते. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण संघाने सामना सुरु होण्यापूर्वी गुडघे टेकून वर्णभेदाविरुद्ध आपला निषेध नोंदवला. यावेळी क्विंटन डिकॉकनेही गुडघे टेकून निषेध दर्शवला. हा व्हिडिओ आयसीसीने शेअर केला.

हेही वाचा : RSA vs SL : चायनामन गोलंदाजासमोर लंकेच्या फलंदाजांनी गुडघे टेकले

माफीनाम्यात क्विंटन डिकॉक काय म्हणाला? ( quinton de kock racism )

क्विंटन डिकॉक आपल्या माफीनाम्यात म्हणाला की, ‘गैरसमजातून मला वर्णद्वेशी ठरवण्यात आल्याने मला वेदना झाल्या आहे. याचा माझ्या कुटुंबावर माझ्या गर्भवती पत्नीवर परिणाम झाला आहे. मी वर्णद्वेशी नाही. माझ्या मनालाच हे ठाऊक आहे आणि मला वाटते की जे मला ओळखतात त्यांना देखील हे माहित आहे.’

ट्विटरच्या माध्यमातून माफीनामा सादर करणारा डिकॉक पुढे म्हणतो, ‘वेस्ट इंडीज विरुद्ध न खेळून मला कोणाचाही अनादर करायचा नव्हता, विशेष करून वेस्ट इंडीज संघाचा तर नाहीच. काही लोकांना हे समजणार नाही की हे सगळे आम्ही सामन्यासाठी निघताना घडले आहे.’ ( quinton de kock racism )

हेही वाचा : T20 WC jarvo : टीम इंडियाला वाचवायला जार्वोची एंट्री होणार?

‘माझ्यामुळे झालेला गोंधळ, निर्माण झालेला राग आणि वेदना याबद्दल मी माफी मागतो. मी या महत्वाच्या विषयावर अजूनपर्यंत बोललो नव्हतो. पण, मला वाटते की मला माझी बाजू मांडली पाहिजे.’ क्विंटन डिकॉकने वेस्ट इंडीज बरोबर न खेळण्याचा निर्णय घेण्याचे कारण सांगितले.

तो म्हणाला ‘प्रत्येक व्यक्तीचे अधिकार आणि समानता हे महत्वाचे आहेत. आपल्याला काही अधिकार आहेत आणि ते महत्वाचे आहेत या शिकवणीतच माझी जडणघडण झाली आहे. ज्यावेळी मला सांगण्यात आले की आम्ही जसे सांगितले आहे तसेच करायचे त्यावेळी मला वाटले की माझे हे अधिकार हिरावून घेण्यात येत आहे.’

Back to top button