file photo 
Latest

Gold Price Today : सोन्याच्या दरात तेजी, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटचा भाव

दीपक दि. भांदिगरे

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : भारतीय सराफा बाजारात आज बुधवारी (दि.१५ सप्टेंबर) सोने -चांदी दरात तेजी दिसून आली. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी सोने (Gold Price Today) प्रति तोळा ३६५ रुपयांनी महागले. तर चांदीचा दर प्रति किलोमागे २०७ रुपयांनी वाढला.

इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, Gold Price Today (दुपारी १२ वाजेपर्यंतचे अपडेट्स) बुधवारी १५ सप्टेंबर रोजी २४ कॅरेट सोने (प्रति १० ग्रॅम) ४७,३८२ रुपये, २३ कॅरेट सोने ४७,१९२ रुपये, २२ कॅरेट सोने ४३,४०२ रुपये, १८ कॅरेट ३५,५३७ रुपये आणि १४ कॅरेट सोन्याचा दर २७,७१८ रुपये होता.

तर शुद्ध चांदीचा प्रति किलो भाव ६३,०१३ रुपयांवर पोहोचला. (हे दुपारपर्यंत अपडेट झालेले दर असून त्यात सायंकाळपर्यंत बदल होऊ शकतो)

एमसीक्सवर भाव पडले…

दरम्यान, एमसीएक्सवर (MCX) ऑक्टोबर डिलिव्हरी सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ४७,२३१ रुपये होता. तर चांदी ६३,४३० रुपयांवर होती.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदी दरात तेजी दिसून येत आहे. डॉलरच्या मुल्यात होणारा चढ-उतार, कोरोनाची परिस्थिती आणि चीनची अर्थव्यवस्थेतील घसरणीच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या किमतीत तेजी येऊ शकते, असे सराफा बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

शुद्ध सोने कसे ओळखाल?

सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते.

दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : चला पाहूया आदेश बांदेकरांच्या घरचा गणपती | Ganesh Festivel Special

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT