Tambda Rassa : झणझणीत तांबडा रस्सा कसा कराल? | पुढारी

Tambda Rassa : झणझणीत तांबडा रस्सा कसा कराल?

पुढारी ऑनलाईन डेस्क : श्रावण संपला आणि घरगुती गणपतीचं विसर्जनही झालं. मासांहार प्रेमींनीदेखील सुटकेचा निश्वास सोडला असेल, प्रत्येकाला झणझणीत कोल्हापुरी तांबडा (Tambda Rassa) रस्सा कधी एकदा मिळतोय आणि सुर्रकन पितोय, असं झालं असेल… चला तर आज तांबडा रस्सा कसा करायचा ते पाहू…

Tambda Rassa

तांबडा रस्सा (Tambda Rassa) साहित्य

१) चारशे ग्रॅम चिकन

२) थोडी आंबट चव येण्यासाठी एक टोमॅटो

३) एक चमचा मिरची पावडर

४) एक चमचा मिक्स मसाला

५) एक चमचा धणे पावडर

६) चवीनुसार मीठ आणि चार कप पाणी

७) अर्धा कप आलं-लसूण पेस्ट

८) तांबडा रस्सा चांगला झणझणीत करण्यासाठी सुकलेला नारळ, ओला नारळ, जिरं, दालचिनी, लवंग, काळं मिरी, तीळ, खसखस, काजू आणि एक कप धणे, या सर्वांची ग्रेवी करून घ्या.

Tambda Rassa

तांबडा रस्सा तयार करण्याची कृती 

१) पेस्ट आणि मीठ एकजीव करून घ्यावे. त्यानंतर ती पेस्ट चिकनला लावून घ्या. किमान २० मिनिटं ते भिजवून ठेवा.

२) गॅसवर कढई ठेवा आणि तेल गरम करायला ठेवा. त्यानंतर टोमॅटो आणि ग्रेवी पेस्ट घाला. एकजीव करून घ्या.

३) तेलात ग्रेवी, टोमॅटो चांगलं मिक्स केल्यानंतर पाणी घालून पुन्हा सर्व मिक्स करू घ्या.

४) त्या पाण्यात लाल तिखट, मसाला आणि कोथिंबिरीची पूड घाला आणि चांगलं मिक्स करुन घ्या.

५) त्यानंतर भिजत ठेवलेले चिकन कढईत टाका आणि त्यात आणखी थोडं पाणी घाला. चिकन शिजू घ्या.

६) चांगला तेलाचा तवंग आला की तुमचा झणझणीत तांबडा रस्सा तयार झाला आहे. या तांबड्या रस्स्यावर चिरलेली कोथिंबीर टाकून घ्या. त्याचा एक खमंग सुगंध येईल.

पहा व्हिडीओ : 10 मिनिटात बनवा उपवासाचे फराळी पकोडे…

या रेसिपी वाचल्या का? 

Back to top button