Gadar 2 
Latest

Gadar ek prem katha 2 : सनी देओल पुन्‍हा एकदा पाकिस्तानमध्ये हाहाकार माजवणार

backup backup

बॉलिवुडच्या इतिहासात देशप्रेमावर सर्वात जास्त गाजलेला चित्रपट म्हणजे गदर: एक प्रेम कथा, प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरून प्रेम दिले. आता गदर: एक प्रेम कथा  या चित्रपटाचा दुसरा पार्ट येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटात आपल्याला पुन्हा सनी देओल आणि अमिषा पटेल मुख्य भुमिकेत दिसणार आहेत. (Gadar ek prem katha २)

अनिल शर्मा दिग्दर्शित या चित्रपटात सनी देओल आणि अमिषा पटेल मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट ॲक्शन आणि ड्रामाने भरलेला होता. दरम्यान तब्बल २० वर्षांनंतर सनी देओल, अमिषा पटेल आणि दिग्दर्शक अनिल शर्मा पुन्हा एकदा 'गदर २' च्या कथेने मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. गदरचे निर्माता अनिल शर्मा यांनी दसऱ्याच्या विशेष प्रसंगी याची घाेषणा केली.

Gadar ek prem katha २ : पुन्हा एकदा सनी देओल 'तारा सिंग' या पात्रात

पुन्हा एकदा सनी देओल 'तारा सिंग' या पात्रात दिसणार आहे. अमिषा पटेल 'सकीना' या भूमिकेत दिसणार आहे. बऱ्यांच वर्षानंतर अमिषा पटेल मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. उत्कर्ष शर्मा या चित्रपटात तारा आणि सकीनाचा मुलगा जीत याची भूमिका साकारणार आहे. गदरची निर्मिती झी स्टुडिओज मार्फत करण्यात येणार आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन अनिल शर्मा करणार आहेत. या चित्रपटाचे कथन शक्तीमान यांच्याकडून केले जाणार आहे तर मिथुनकडून संगीत देण्यात येणार आहे. दरम्यान हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या पसंतीस येणार आहे. दरम्यान सोशल मीडियावर सनी, अमीषा, उत्कर्ष आणि 'गदर 2' शी संबंधित इतरांनी सिक्वेलचा फस्ट लूक शेअर केला आहे.

तारा सिंग म्हणून लोकांनी ओळखले

सनी देओलने एका मुलाखतीमध्‍ये सांगितले की, गदर: एक प्रेम कथा या चित्रपटातील तारा सिंग पात्राने प्रेक्षकांच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केले आहे. या चित्रपटाचा प्रेक्षकांवर इतका प्रभाव पडला की, नंतर लोक मला तारा सिंग म्हणू लागले. दरम्यान येणारा चित्रपटात माझ्या पात्राभोवती कथा कशी फिरते हे पाहणे मनोरंजक असेल. गदर हा चित्रपट आतापर्यंतच्या माझ्या आवडत्या भूमिकांपैकी एक आहे.

हेही वाचलं का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT