सोमनाथ अवघडेचा फ्री हिट दणका चित्रपट लवकरचं भेटीला  
Latest

फँड्री फेम जब्याच्या ‘फ्री हिट दणका’ चित्रपटाने होणार प्रेमाचा निर्णय

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

काहीच दिवसांपूर्वी 'फ्री हिट दणका' चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाल्याने प्रेक्षकांमध्ये निर्माण झालेली उत्सुकता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्याने अधिकच वाढली आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून सर्वत्र त्याचीच चर्चा आहे. ग्रामीण कथा, क्रिकेट, उत्तम संवाद, जबरदस्त अभिनय या सगळ्यांमुळे चित्रपटाचा ट्रेलर सगळीकडे गाजत आहे. 'फ्री हिट दणका' चित्रपटाचा ट्रेलर जसाजसा पुढे जातो तशीतशी चित्रपटाबद्दलची उत्कंठा वाढत जाते.

उघडेवाडी गावातील धुमाकुळ पाटील आणि निगडेवाडी गावातील अण्णा पाटील या दोन पाटील घराण्यांमध्ये वैमनस्य असून धुमाकुळ पाटीलाच्या मुलाचे अण्णा पाटीलांच्या मुलीवर प्रेम असल्याचे ट्रेलरमध्ये दिसत आहे. आता या दोघांच्या प्रेमाचे भविष्य या दोन गावांमध्ये दरवर्षी भरवल्या जाणाऱ्या क्रिकेटच्या स्पर्धेवर अवलंबून आहे.

या दोघांचे प्रेम कसे जुळते? त्यांच्या प्रेमाचे पुढे नक्की काय होते? या दोन गावांमध्ये नक्की कोणत्या कारणामुळे वैमनस्य आहे? या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरासाठी प्रेक्षकांना १७ डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

'फँड्री' फेम सोमनाथ अवघडे सोबत या चित्रपटात अपूर्वा एस. आहे. विशेष म्हणजे 'सैराट' चित्रपटातील सुपरहिट जोडी अरबाज (सल्या) आणि तानाजी (लंगड्या), सुरेश विश्वकर्मा, अनिल नगरकर, गणेश देशमुख यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

सुनील मगरे दिग्दर्शित या चित्रपटाची कथा आणि पटकथा सुनील मगरे यांची आहे. आकाश अलका बापू ठोंबरे, मेघनाथ गुरुनाथ सोरखडे आणि सुनिल मगरे चित्रपटाचे निर्माते आहेत. तर नितीन बापू खरात, सुधाकर लोखंडे यांनी सहनिर्मात्यांची धुरा सांभाळली आहे. एसजीएम फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाचे लेखन आणि संवाद संजय नवगीरे यांचे आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT