सुख म्हणजे नक्की काय असतं : जयदीप-गौरी पुन्हा अडकणार लग्नाच्या बेडीत | पुढारी

सुख म्हणजे नक्की काय असतं : जयदीप-गौरी पुन्हा अडकणार लग्नाच्या बेडीत

पुढारी ऑनलाईन डेस्क

महाराष्ट्राची नंबर वन मालिका ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’मध्ये लवकरच जयदीप-गौरी यांच्या लग्नबंधनात अडकणार आहेत.माई आणि दादांच्या इच्छेखातर पुन्हा एकदा लग्नाचा घाट घालण्यात आला आहे. शिर्के-पाटील कुटुंबात एखादा सणसमारंभ असो वा कोणतंही शुभकार्य ते थाटातच पार पडतं. त्यामुळे जयदीप-गौरी यांचं लग्नदेखील अगदी थाटात पार पडणार आहे. प्री वेडिंग फोटोशूटपासून, मेहंदी, हळद, वरात आणि लग्नाचा शाही थाट पाहायला मिळेल. लग्नात दोघांचा लूक नेमके कसा असणार याची उत्सुकता आहे.

प्री वेडिंग फोटोशूटसाठी त्यांच्यासह संपूर्ण शिर्के-पाटील कुटुंबाने रेट्रो लूकला पसंती दिली आहे. दोघेही काशिनाथ घाणेकर आणि आशा काळे यांच्या रुपात दिसणार आहेत. तर उदय आणि देवकी दिसतील दादा कोंडके आणि उषा चव्हाण यांच्या रुपात. शेखर-रेणुकेने अशोक सराफ आणि रंजना यांच्यासारखा लूक केलाय तर मल्हार बनलाय दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे.

माई आणि दादा यांनी सुद्धा ७०च्या दशकातला लूक धारण केला आहे. अम्मा दिसणार आहे ललिता पवार यांच्या रुपात. संपूर्ण शिर्के-पाटील कुटुंब या लग्नाच्या निमित्ताने हटके अंदाजात दिसणार आहे.

खरंतरं खूप काळानंतर आणि खूप संघर्षानंतर शिर्के-पाटील कुटुंब आनंदात आहे. त्यांच्या या आनंदात प्रेक्षकांनी देखील सहभागी व्हावं अशी इच्छा आहे. तेव्हा सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेचे यापुढील भाग पाहायला विसरु नका रात्री ९.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

 

View this post on Instagram

 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

Back to top button