Animal Song  
Latest

Animal Song : रश्मिका-रणबीरचा रोमॅंटिक अंदाज, किसिंग सीन व्हायरल

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्ना यांच्या आगामी 'एनिमल' चित्रपट लवकरच चाहत्याच्या भेटीस येत आहे. याचदरम्यान चित्रपटातील काही लूक जोरदार व्हायरल झाल्यानंतर आता चित्रपटातील धमाकदार पहिले गाणे ( Animal Song ) रिलीज करण्यात आलं आहे. या गाण्याचे बोल 'हुआ मैं' असे असून चाहत्यांची त्याला भरघोष प्रतिसाद दिला आहे. खास करून या गाण्यातील रश्मिका आणि रणबीरच्या केमिस्ट्रीसोबत दोघांचा किसिंग सीन सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

संबधित बातम्या 

'हुआ मैं' या गाण्यात ( Animal Song ) सुरूवातील रश्मिकाच्या घरातीस सदस्य तिला 'रणबीरविषयी हे काय प्रकरण चालू आहे' म्हणत ओरडताना दिसतात. याच दरम्यान रश्मिका आणि रणबीर दोघेजण लिपलॉक करताना दिसतात. याशिवाय दोघेजण एका प्रायव्हेट विमानात जावून राहताना आणि रश्मिका विमान चालवतानादेखील दिसत आहे. शेवटी दोघेजण हिमालयातील पर्वतावर एका छोट्याशा मंदिरात लग्न करतात आणि दोघेजण मंदिराच्या भोवती फिरत एकमेंकाच्या गळ्यात हार घालताना दिसत आहेत. यावरून दोघेजण पहिल्यांदा प्रेमात पडतात आणि नंतर लग्न बंधानात अडकताना दिसतात.

हे गाणे सोशल मीडियावरील युट्यूबवर खूपच व्हायरल झाले आहे. काही युजर्सना रश्मिका आणि रणबीरचा लिपलॉक सीन पंसतीस उतरला आहे. तर काही नेटकऱ्यांना अजिबात आवडलेला नाही. यामुळे संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत.

'हुआ मैं' गाण्याचे बोल मनोज मुंतशिर शुक्ला यांनी लिहिले असून ते राघव चैतन्य आणि प्रीतम यांनी गायिले आहे. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित 'अ‍ॅनिमल' रणबीर कपूरला पूर्णपणे वेगळ्या अवतारात दिसणार आहे. या चित्रपटात अनिल कपूर रणबीरच्या वडिलांच्या भूमिकेत आहे. 'अ‍ॅनिमल' चित्रपट ऑगस्ट महिन्यात रिलीज होणार होता, मात्र, रिलीज डेटची तारीख १ डिसेंबर करण्यात आली आहे. दरम्यान दर्जेदार, चांगला चित्रपट साकारण्यासाठी रिलीज डेट वाढविली असल्याचे निर्मात्यांनी सांगितले होते.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT