Animal : रश्मिकाची गाडी सुपरफास्ट! रणबीरसोबत मिळाला चित्रपट | पुढारी

Animal : रश्मिकाची गाडी सुपरफास्ट! रणबीरसोबत मिळाला चित्रपट

 पुढारी ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर त्याच्या आगामी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटांमुळे चर्चेत आला आहे. या चित्रपटात रणबीरसोबत बॉलिवूड अभिनेता आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आलियाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ब्रह्मास्त्र चित्रपटातील आलियाचा पहिला लूक सोशल मीडियावर शेअर झाला आहे. यात दरम्यान रणबीर कपूरच्या आणखी एका आगामी ‘एनिमल’ ( Animal ) चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे. या चित्रपटात सध्या रणबीरसोबत बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) ची एन्ट्री होत असल्याचे वृत्त समोर आले आहे.

आलिया भट्टने नुकतेच तिच्या इंन्स्टाग्रामवर आपल्या वाढदिवसानिमित्ताने ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटातील पहिला लूक शेअर केला आहे. या चित्रपटात आलिया ‘ईशा’च्या भूमिकेत दिसणार आहे. शेअर झालेल्या लूकमध्ये आलिया वेगवेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने ‘हॅप्पी बर्थडे टू मी. तुमच्यासाठी ‘ईशा’ला भेटण्याचा यापेक्षा चांगला दिवस आणि चांगला मार्ग असू शकत नाही. अयान माझा वंडर बॉय. आई लव्ह यू. धन्यवाद #ब्रह्मास्त्र.’ असे लिहिले आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यासह बॉलिवूड स्टार्संनी आलिया आणि रणबीर कपूर भरभरून कौतुक केले आहे.

याच दरम्यान रणबीर कपूर त्याच्या आगामी ‘एनिमल’ (Animal) चित्रपटाची जोरदार चर्चा झाली. या चित्रपटात रणबीरसोबत बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा दिसणार आहे. दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी ‘एनिमल’ चित्रपटाची निर्मिती करत आहेत. तर सध्या रणबीरसोबत या चित्रपटात ‘पुष्पा’ फेम आणि अभिनेत्री रश्मिका मंदान्ना हिची एन्ट्री होणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.

एका रिपोर्टच्या माहितीनुसार, ‘एनिमल’ चित्रपटातील एका गाण्यासाठी दिग्दर्शकांनी अभिनेत्री रश्मिका मंदान्नाशी संपर्क साधला असल्याची माहिती मिळाली आहे. तर चित्रपट निर्मात्यांनी रश्मिकासोबत चित्रपटाविषयी बोलणी सुरू केल्याचेही समोर आले आहे. परंतु, रश्मिका ही ऑफर स्वीकारली आहे की नाही? याबाबतचा अद्याप कोणताही खुलासा झालेला नाही.

रश्मिका मंदान्ना ‘पुष्पा’ या चित्रपटात अभिनेता अल्लू अर्जुनसोबत दिसली होती. यातील तिचा अभिनय आणि ‘श्रीवल्ली’ गाणे खूप चाहत्यांच्या पसंतीस उतरले होते. सध्या पुष्पा चित्रपटाच्या पुढच्या भागात ही रश्मिका दिसणार आहे. या चित्रपटानंतर ती रातोरात मोठी स्टार बनली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranbir kapoor 🔵 (@ranbir_kapoooor)

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranbir kapoor 🔵 (@ranbir_kapoooor)

Back to top button