Animal Pre-teaser : हातात कुऱ्हाड घेवून रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’चा प्री-टीझर रिलीज | पुढारी

Animal Pre-teaser : हातात कुऱ्हाड घेवून रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’चा प्री-टीझर रिलीज

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता रणबीर कपूर आगामी ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटाचा धमाकेदाकर आणि जबरदस्त प्री-टीझर ( Animal Pre-teaser ) नुकताच रिलीज करण्यात आला आहे. या टिझरमध्ये हातात कुऱ्हाड घेवून वार करणाऱ्या रणबीरचे हिंस्र रूप चाहत्यांना पाहायला मिळाले आहे.

अभिनेत्री रश्मिका मंदानाने तिच्या इन्स्टाग्रामवर ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाचा धमाकेदार प्री-टीझर ( Animal Pre-teaser ) रिलीज करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये रणबीर कपूर हातात कुऱ्हाड घेवून काही मुखवटा परिधान केलेल्या लोकांना मारताना दिसत आहे. यात रणबीरचे हिंस्र रूप पाहायला मिळालेय. यावेळी रणबीरने पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि धोतर परिधान केले आहे. यावरून रणबीर एका पॉवरफूल गँगस्टरच्या भूमिकेत असल्याचे बोलले जात आहे. या टिझरच्या बॅकग्रांऊडला एक पंजाबी गाण वाजत आहे.

‘अ‍ॅनिमल’ चित्रपटात रणबीर कपूर आणि रश्मिका मंदानासोबत अभिनेता बॉबी देओल, अनिल कपूर आणि तृप्ती डिमरी यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट ११ ऑगस्ट २०२३ रोजी चित्रपट गृहात रिलीज होणार आहे. हिंदी, तेलुगू, तामिळ, कन्नड, मल्याळम या पाच भाषांमध्ये चित्रपट रिलीज होणार आहे.

संबंधित बातम्या

हेही वाचा : 

Back to top button