Animal : रणबीरच्या वाढदिवसानिमित्त थरकाप उडवणारा ‘ॲनिमल’ चा टीझर रिलीज | पुढारी

Animal : रणबीरच्या वाढदिवसानिमित्त थरकाप उडवणारा 'ॲनिमल' चा टीझर रिलीज

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरच्या आगामी ‘ॲनिमल’ ( Animal ) या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. याच दरम्यान रणबीरच्या वाढदिवसानिमित्ताने थरकाप उडवणारा ‘ॲनिमल’ चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. यावर्षीच्या सुरूवातीला रणबीरने या चित्रपटाची घोषणा करून चाहत्याच्या आनंद द्विगुणीत केला होता.

संबधित बातम्या 

रणबीर कपूरचा आज २८ सप्टेंबरला ४१ वा वाढदिवस असल्याने त्याच्या आगामी ‘ॲनिमल’ ( Animal )चित्रपटाची टीझर इन्टाग्रामवर शेअर केला आहे. दोन मिनिट २६ सेकंदाच्या टीझरमध्ये पहिल्यांदा रश्मिका मंदाना आणि रणबीर कपूर एकमेंकाशी बोलताना दिसतात. यानंतर अनिल कपूर रणबीरला जोरदार कानाखाली मारत असतो तर रणबीर मात्र, शांत खुर्चीत बसलेला दिसतोय. यानंतर वैतागलेला अनिल कपूर त्याच्या पत्नीवर ओरडतो. दरम्यानच तो आपण एक गुन्हेगार तयार केला आहे असे म्हणतो. रश्मिका आणि रणबीर याच्यात प्रेम दाखवण्यात आलं आहे.

चित्रपटाची टीझर रिलीज होताच चाहत्यांनी भरभरून कौतुक केलं आहे. या चित्रपटात रणबीरसोबत अनिल कपूर, बॉबी देओल आणि साऊथची लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे पोस्टर आधीच रिलीज करण्यात आले आहे.

हेही वाचा :

Back to top button