Animal : Ranbir Kapoor च्या ॲनिमलचा टीजर, नव्या पोस्टरसह मोठी घोषणा | पुढारी

Animal : Ranbir Kapoor च्या ॲनिमलचा टीजर, नव्या पोस्टरसह मोठी घोषणा

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरचा ‘ॲनिमल’ वरून एक मोठी माहिती समोर आलीय. (Animal : Ranbir Kapoor ) अखेर ॲनिमलची प्रतीक्षा संपली असून निर्मात्यांनी चित्रपटाची रिलीज डेटची घोषणा केली आहे. हा चित्रपट १ डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. सोबतच निर्मात्यांनी नव्या पोस्टरसह टीजर रिलीज डेटची घोषणा केलीय. (Animal : Ranbir Kapoor )

animal
animal

‘ॲनिमल’ची रिलीज डेट समोर

निर्मात्यांनी आज नव्या पोस्टरसह ॲनिमलच्या टीजर डेटची घोषणा केलीय. रणबीर कपूरच्या या टित्रपटाचा टीजर २८ सप्टेंबर रोजी रिलीज होईल. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित हा चित्रपट ५ भाषांमध्ये रिलीज होईल. हा चित्रपट हिंदीशिवाय तेलुगु, कन्नड, मल्याळम आणि तमिळ भाषेत रिलीज होईल. रणबीरची भूमिका आतापर्यंतच्या भूमिकांपेक्षा एकदम वेगळी आहे.

Back to top button