Latest

FIH Women’s Nations Cup : भारतीय महिला हॉकी संघाचा सलग तिसरा विजय, दक्षिण आफ्रिकेचा २-० ने पराभव

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क :  आज (दि. १४) रोजी झालेल्या भारतीय महिला हॉकी संघाने एफआयएच महिला राष्ट्र चषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा २-० असा पराभव केला. सामन्यात टीम इंडियाने चमकदार कामगिरी करत सलग तिसरा विजय मिळवला. याआधीच उपांत्य फेरीत प्रवेश केलेल्या भारतीय संघाने आपल्या गटात प्रथम क्रमांक पटकावला. भारताकडून दीप ग्रेस एक्का आणि गुरजित कौर यांनी प्रत्येकी एक गोल केला. (FIH Women's Nations Cup)

या सामन्यात भारतीय संघाने शानदार सुरुवात केली. संघाने पहिल्या हाफपासूनच दक्षिण आफ्रिकेच्या संघावर दडपण ठेवला. त्याचा फायदा टीम इंडियाला सामन्याच्या १४व्या मिनिटाला मिळाला. दीप ग्रेस एक्काने उत्कृष्ट गोल करत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. (FIH Women's Nations Cup)

यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. चौथ्या क्वार्टरमध्ये सामना संपण्याच्या एक मिनिटापूर्वी भारताने आणखी एक गोल केला. ५९व्या मिनिटाला गुरजीत कौरने चेंडू गोलपोस्टमध्ये टाकला. जागतिक क्रमवारीत आठव्या क्रमांकावर असलेल्या भारताने गटात नऊ गुण मिळवले. यापूर्वी त्यांनी चिलीचा ३-१ आणि जपानचा २-१ असा पराभव केला होता.

हेही वाचा;

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT