Maharashtra-Karnataka : केंद्र सरकारची भूमिका एकतर्फी नसावी, देवेंद्र फडणवीस यांची मागणी | पुढारी

Maharashtra-Karnataka : केंद्र सरकारची भूमिका एकतर्फी नसावी, देवेंद्र फडणवीस यांची मागणी

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्लीत बुधवारी गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यात महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद विषयावर बैठक पार पडली. या बैठकीत सुप्रिम कोर्टात केंद्रसरकारची एकतर्फी भुमिका नसावी अशी विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या केंद्रीय बैठकीमध्ये झालेल्या सीमावाद विषयाच्या चर्चेनंतर त्यांनी प्रसारमाध्यमाशी संवाद साधला.

केंद्रानं पहिल्यांदा या विषयात हस्तक्षेप केलेला आहे. दोन्ही राज्यांना या विषयावर चर्चेसाठी एकत्र बोलावले आहे. महाराष्ट्रातील मंत्र्यांनाकर्नाटकात जाण्यापासून रोखल्याचे प्रकरण घडले होते. यावर त्यांनी नाराजी देखील व्यक्त केली. तसेच ते असंही म्हणाले की, बेळगावात आम्ही कोणालाही अडवणार नाही, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे.

बेळगावात हल्ले करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. आम्ही हिंसाचार भडकू दिला नाही. असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. काही संघटना व व्यवस्था ही परिस्थिती बिघडविण्याचे काम करत आहेत. राजकारण सोडून मराठी जनेतीसाठी उभं रहावे असे आवाहन विरोधी पक्षांना त्यांनी केले आहे. सिमावादावर आम्ही सुप्रिम कोर्टात लढणार आहोत. अशी माहिती फडणवीस यांनी यावेळी दिली.

हेही वाचा

Back to top button